Headlines

वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूसाठी नवा जोडरस्ता; १,७२२ कोटींच्या प्रकल्पास राज्य सरकारची मंजुरी| Maharashtra Times


म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू वांद्रे किल्ला परिसराशी जोडण्यासाठी अतिरिक्त जोडरस्त्याला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. वांद्रे किल्ला परिसरातून सागरी सेतूकडे जाणाऱ्या ३.५५ किलोमीटर लांबीच्या या जोडरस्त्याच्या बांधकामासाठी एकूण १,७२२.४० कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

वांद्रे किल्ला ते सागरी सेतू थेट मार्ग

वांद्रे पश्चिमेतील पाली हिल, बँडस्टँड आणि वांद्रे किल्ला परिसरात गेल्या काही वर्षांत वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पर्यटनस्थळे, किनारी भागातील वाढती वर्दळ, पुनर्विकास प्रकल्प तसेच पंचतारांकित हॉटेलांमुळे या भागात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचीही वारंवार ये-जा असते. त्यामुळे स्थानिक वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण पडत असून, सागरी सेतूकडे जाण्यासाठी पर्यायी आणि जलद मार्गाची गरज व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर वांद्रे किल्ला परिसरातून थेट सागरी सेतूशी संपर्क साधणारा हा जोडरस्ता महत्त्वाचा ठरणार आहे.

Maharashtra TimesMaharashtra Weather: महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालणार, तीन दिवस कोसळधारेचा इशारा; पुण्यात जुलैतील पाऊस विक्रम मोडणार

या जोडरस्त्याच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी १,१८३.७९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जीएसटी, सल्लागार शुल्क, देखभाल, पर्यवेक्षण, प्रशासकीय आणि इतर अनुषंगिक खर्चांचा समावेश केल्यानंतर प्रकल्पाचा एकूण खर्च १,७२२.४० कोटी रुपयांवर जाणार आहे. या कामासाठी आवश्यक निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार असून, प्रचलित नियमांनुसार निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

सध्या ९.८ किलोमीटर लांबीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूचे काम प्रगतिपथावर आहे. या प्रकल्पात वांद्रे, कार्टर रोड, जुहू आणि वर्सोवा येथील जोडरस्त्यांचा समावेश आहे. नव्या जोडरस्त्यामुळे वांद्रे किल्ला, पाली हिल आणि बँडस्टँड परिसरातून सागरी सेतूपर्यंतचा प्रवास अधिक वेगवान होईल. तसेच पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा या उपक्रमाच्या माध्यमातून पूर्ण होईल, असा सरकारचा मानस आहे.

आठ हजार झाडेतोडण्यास मंजुरी

राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या धारावी पुनर्विकास प्रकल्पात आठ हजार झाडांची कत्तल होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मात्र, या बदल्यात महापालिकेकडून धारावी परिसरात उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या जागेत ३० हजार झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.

Maharashtra TimesMumbai Local: महामुंबईत रेल्वेविस्ताराचे लक्ष्य; पनवेल-कर्जत रेल्वेमार्ग, कळवा-ऐरोली उन्नत मार्ग, तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचाही विकास

कत्तल होणाऱ्या झाडांच्या बदल्यात वृक्षलागवड करण्यात येणाऱ्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून झाडांच्या पुनर्रोपणाबाबत माहिती घेण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या २६ वॉर्डांत मॅक लिफ्टन मशीन उपलब्ध करून दिल्यास झाडांची छाटणी योग्य प्रकारे करता येईल, अशी माहिती वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य, सभागृह नेते गणेश खणकर यांनी दिली. धारावी पुनर्विकासासह मरिन लाइन्स-ऑरेंज गेट बोगदा, पवई, कांदिवली, घाटकोपर आदी महत्त्वाच्या विकास प्रकल्पांसाठी अडथळा ठरणाऱ्या एकूण २,७१० झाडे तोडण्यास व पुनर्रोपण करण्यास मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मंगळवारी मंजुरी दिली.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत