Headlines

वडिलांचं दोन बहिणींसोबत लग्न, सख्खी आई कोण? हे माहितीच नाही; साऊथ इंडस्ट्रीतल्या ‘ट्रॅजेडी क्वीन’चा मोठा खुलासा


Shruthi Krishna Life Story: दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतली प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती कृष्णा सध्या चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं वैयक्तिक आयुष्याबद्दल असा काही खुलासा केलाय की,ज्याची चांगलीच चर्चा सुरू आहे. आपल्याला जन्म देणारी खरी आई कोण आहे, हे तिला आजही माहित नाही, असं तिनं सांगितलंय. तिची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे.

shruti krishna life story in marathi
साऊथ सिनेइंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री श्रुती कृष्णानं सिनेमा, राजकारण, अशा वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावलं. पण एका आगळ्यावेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून येत, आपल्या कलेच्या जोरावर तब्बल तीन वेळा राज्य पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या श्रुतीचं आयुष्य एखाद्या सिनेमाच्या कथेप्रमाणे आहे,असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तिच्या आयुष्यात अनेक चढ -उतारही आले. तीन पालक असलेल्या कुटुंबात ती वाढली. दोन आईंचं प्रेम तिला मिळालं. पण आजही खरी आई कोण हे माहिती नसल्याचं ती सांगते.

वडिलांचं जुळ्या बहिणींशी लग्न

वडिलांचं जुळ्या बहिणींशी लग्न

तर श्रुती कृष्णानं नुकत्याच दिलेल्या काही मुलाखतींमध्ये तिच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. श्रुतीचे वडील जी. व्ही. कृष्णा हे एका नाटक कंपनीचे मालक होते. या नाटक कंपनीत काम करणाऱ्या त्यांनी दोन जुळ्या बहिणींशी लग्न केलं होतं. श्रुतीला भावंडही आहेत, त्यांना त्यांची खरी आई कोण, हे मात्र सांगण्यात आलं नाहीये. तिला देखील आजही तिची जन्मदाती सख्खी आई कोण माहिती नाहीये. दोघीही तिला तितकीच माया करता, असंही तिनं सांगितलं.

शोधण्याची किंवा जाणून घेण्याची गरज कधी भासलीच नाही

शोधण्याची किंवा जाणून घेण्याची गरज  कधी भासलीच नाही

श्रुती म्हणाली की,मला दोन आई आहे आणि दोघींनीही माझ्यावर सख्ख्या लेकीप्रमाणे भरभरून प्रेम केलं. त्यामुळं आमची खरी आई कोण आहे, हे शोधण्याची किंवा जाणून घेण्याची गरज आम्हाला कधी भासलीच नाही. आमच्या कुटुंबात यावरून कधीच भेदभाव झाला नाही.

बालकलाकार म्हणून सुरुवात , ‘श्रुती’ नावाचा रंजक किस्सा

बालकलाकार म्हणून सुरुवात , 'श्रुती' नावाचा रंजक किस्सा

श्रुतीचं मूळ नाव ‘गिरीजा’ असं होतं. तिचा जन्म रंगभूमी कलावंतांच्या कुटुंबात झाल्यानं लहानपणापासूनच तिला अभिनयाचा वारसा मिळाला. अवघ्या १४ व्या वर्षी तिनं ‘नंबिद्रे नंबी बित्रे बिडी’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यावेळी तिचं स्क्रीन नाव ‘प्रियदर्शिनी’ ठेवण्यात आलं होतं, जे तिला फारसं आवडले नव्हतं.पुढे १९९० मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक द्वारकीश यांच्या ‘श्रुती’ या चित्रपटात काम करत असताना तिनं आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला. दिग्दर्शकांच्या सल्ल्यानुसार तिनं चित्रपटाचं नावच स्वतःचं नाव म्हणून स्वीकारलं आणि अशा प्रकारे ‘गिरीजा’ची लोकप्रिय अभिनेत्री ‘श्रुती’ झाली.

सिनेसृष्टीतील ‘ट्रॅजेडी क्वीन’

सिनेसृष्टीतील 'ट्रॅजेडी क्वीन'

श्रुतीनं तिच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट आणि महिलाप्रधान चित्रपट दिले.तिचं २५ वर्षांचं करिअर आहे. चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं भावनिक आणि रडवणाऱ्या भूमिका साकारल्यामुळं तिला कन्नड सिनेसृष्टीत ‘ट्रॅजेडी क्वीन’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिला तीन वेळा राज्य पुरस्कारानं गौरविण्यात आलं आहे. तसंच ती ‘बिग बॉस कन्नड’ची विजेतीही ठरली आहे.

राजकीय करिअर

राजकीय करिअर

चित्रपटांसोबतच श्रुती कृष्णानं राजकारणातही आपलं नशीब आजमावलं. ती भारतीय जनता पक्षाची (BJP) सक्रिय सदस्य आहे. तिनं कर्नाटक महिला व बालविकास महामंडळ आणि कर्नाटक राज्य पर्यटन विकास महामंडळ या दोन्ही महत्त्वाच्या संस्थांच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.

वैयक्तिक आयुष्यातील वादळ

वैयक्तिक आयुष्यातील वादळ

श्रुती कृष्णाच्या वैयक्तिक आयुष्यात नात्यांच्या बाबतीत मोठे चढ-उतार आले. तिनं पहिलं लग्न दिग्दर्शक एस. महेंद्र यांच्याशी केलं होतं. अनेक वर्षे एकत्र संसार केल्यानंतर त्यांच्यात मतभेद झाले आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. या पहिल्या लग्नापासून तिला एक मुलगी देखील आहे.

दुसरं लग्न अत्यंत नाट्यमय वळणावर संपलं

दुसरं लग्न अत्यंत नाट्यमय वळणावर संपलं

त्यानंतर, श्रुतीनं चंद्रचूड यांच्याशी दुसरं लग्न केले. मात्र, हे लग्न अत्यंत नाट्यमय वळणावर संपलं. चंद्रचूड यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला अधिकृत घटस्फोट न देताच श्रुतीशी लग्न केलं होतं, अशी माहिती समोर आली. जेव्हा ही बाब समोर आली, तेव्हा श्रुतीनं चंद्रचूड यांच्या पहिल्या पत्नीची बाजू घेत तिचं समर्थन केलं आणि हे दुसरं लग्नही अवघ्या काही काळातच संपुष्टात आलं. दोन वेळा झालेल्या या घटस्फोटांच्या दुःखातून सावरत श्रुतीने स्वतःला खंबीरपणे सांभाळलं.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा