डोंबिवलीतील डॉक्टरांवर अरेरावी आणि महिला डॉक्टरांना धक्काबुक्की करण्याचं प्रकरण चांगलंच तापलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याविरोधात विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून सध्या या प्रकरणी म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आमदार आदित्य ठाकरे यांनी डोंबिवलीत येत या प्रकरणावरून रमेश म्हात्रे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारवर आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे.