Vaibhav Sooryavanshi Debut News : भारताचा स्टार खेळाडू बेबी बॉसने शनिवारी डेब्यू करत इतिहास रचलाच. आयपीएलनंतर पठ्ठ्याची निवड तिरंगा मालिकेसाठी भारत अ संघात निवड झाली. त्यापाठोपाठ थेट भारतीय संघात एन्ट्री झाली. शनिवारी तो दिवस उजाडला वैभव भारताकडून मैदानात उतरला, पठ्ठ्याने ही बातमी सर्वात आधी कोणाला सांगितली जाणून घ्या.

मला माझ्या डेब्यूबद्दल कळलं, तेव्हा मी सर्वात आधी माझ्या रूममध्ये जाऊन ही बातमी पप्पांना सांगितली. कारण ते माझ्यासोबत इथेच राहत आहेत. त्यांच्याशिवाय मी ही गोष्ट कुणाला सांगितली नव्हती. यानंतर मी मम्मीला आणि माझे कोच रोमी भिंडर सर यांना सांगितलं, जे नेहमी माझ्यासोबत असतात. पण सगळ्यात आधी पप्पांनाच सांगितलं. ही बातमी ऐकून पप्पा खूप खुश झाले आणि म्हणाले, “तू आतापर्यंत जसा खेळत आली आहेस तसाच खेळत रहा. कोणताही दबाव घेऊ नकोस आणि फक्त स्वतःच्या खेळावर विश्वास ठेव, असं वैभव सूर्यवंशी याने सांगितलं.
INDvsENG : विजयाची पाटी कोरीच! कॅप्टन श्रेयस अय्यरने 3 जणांना पराभवासाठी ठरवलं व्हिलन, कोणाची नावं घेतली?
‘ओल्ड ट्रॅफर्ड’ वर ही लढत झाली. भारताने इंग्लंडसमोर १९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य इंग्लंडने १९व्या षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात पार केले. यात जेकब बेथेलने ब्रूकसोबत २४ चेंडूंत ५० धावांची, बँटनसोबत ५० चेंडूंत ६७धावांची भागीदारी रचली. तसेच, सॅम करनसोबत त्याने १६ चेंडूंत ४६ धावांची भागीदारी रचली. अखेरच्या चार षटकात इंग्लंडला ४९ धावांची आवश्यकता होती. मात्र, सतराव्या षटकात इंग्लंडने २९ धावांची लूट केली. बिश्णोईच्या या षटकात जेकबने तीन षटकार लगावले; तसेच एक चौकार मारला.
IND vs ENG 2nd T20 : इंग्लंडकडून भारताचा दुसऱ्या टी-20 मध्ये पराभव, 22 वर्षांच्या पोराने फिरवली संपूर्ण मॅच, सामन्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट
वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. जोफ्रा आर्चर आणि जोश टंग यांना षटकार लगावले. मात्र, पाचव्या षटकात विल जॅक्सच्या गोलंदाजीवर पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात तो यष्टीचीत झाला. मात्र, संथ सुरुवातीनंतर त्याने आणि अभिषेक शर्माने २९ चेंडूंत ५० धावांची सलामी दिली. पहिल्या दोन षटकांत दहाच धावा झाल्या होत्या. पॉवरप्लेमधील अखेरच्या चेंडूवर अभिषेकही परतला. त्यामुळे पहिल्या सहा षटकांअखेर भारताची २ बाद ६५ अशी स्थिती होती. त्यानंतर ईशान किशन, कर्णधार श्रेयस अय्यर, तिलक वर्मा यांनी दिलेल्या योगदानामुळे भारताने १९० धावा केल्या.
खेळ आकड्यांचा…
- ४ एकाही एकाही फलंदाजाने ५० हून अधिक धावा न करताही भारतीय संघाने चौथ्यांदा १९० धावांचा टप्पा गाठला. यापूर्वी, २०१९ मध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध (२०८ धावा), २०२२मध्ये विंडीजविरुद्ध (१९१) आणि २०१७मध्ये विंडीजविरुद्धच (१९० धावा) अशी कामगिरी केली होती.
- तिलक वर्माची जोफ्रा आर्चरविरुद्धची कामगिरी, २७३.१ तिलकने जोफ्राव्या २६ चेडूत २७३.१ च्या स्ट्राइक रेटने ७१ धावा केल्या आहेत. यात तीन चौकार आणि नऊ षटकारांचा समावेश. जोफ्राच्या गोलंदाजीवर तो एकदा बाद झाला आहे.

