Headlines

मायकेल ब्लूमबर्ग यांचा कॉलम:जगातील शहरांनी एकत्र येऊन‎ हवामान बदलाशी लढा द्यावा‎




‎‎‎‎‎‎‎‎हवामान बदलाच्या विरोधात संपूर्ण जग एक लढा देत‎आहे. या संघर्षात ध्येये आणि वचनबद्धतेची कोणतीही‎कमतरता राहिलेली नाही. पण शेवटी लोक या दिशेने‎झालेली प्रगती या आधारावर मोजतात की ते त्यांच्या‎दैनंदिन जीवनात काय अनुभवतात आणि हवामान‎कृतीचा प्रभाव जगातील शहरांत जास्त थेट दिसून येतो.‎ शहरांमध्ये आता ही समज निर्माण होऊ लागली आहे‎की हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणारे आणि‎हवामानविषयक आव्हानांचा सामना करण्याची क्षमता‎वाढवणारे उपाय लोकांचे दैनंदिन जीवनही अधिक‎चांगले बनवतात. ऊर्जा-कार्यक्षम घरे विजेचे बिल कमी‎करतात. अक्षय ऊर्जा आयातित-इंधनांवरील‎अवलंबित्व आणि तेल-गॅसच्या किमतीत होणारी वाढ‎यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी कमी करते. उत्तम‎सार्वजनिक वाहतूक आणि सुरक्षित सायकल पायाभूत ‎‎सुविधा लोकांना येण्या-जाण्यासाठी अधिक‎किफायतशीर आणि निरोगी पर्याय उपलब्ध करून देतात. ‎‎झाडे आणि ग्रीन बेल्ट हवेच्या गुणवत्तेत सुधारणा‎घडवून आणतात, परिसर थंड ठेवतात आणि शहरे ‎‎राहण्यासाठी अधिक सुखद बनवतात. पण हवामान ‎‎कृतीचा उद्देश केवळ एवढाच नाही. हा उष्ण होत‎असलेल्या पृथ्वीच्या आधीच स्पष्ट झालेल्या‎प्रभावांपासून लोकांना सुरक्षित ठेवण्याचाही प्रयत्न आहे.‎उष्णतेची लाट, पूर, दुष्काळ आणि अति-हवामानाच्या‎घटना सतत अधिक तीव्र होत आहेत. शहरे आणि त्यांचे‎रहिवासी या आव्हानांचा सर्वात आधी सामना करत‎आहेत. म्हणूनच हवामान बदलाचा सामना करण्यासाठी‎अनुकूलतेच्या उपायांची साखळी पुढे वाढवावी लागेल.‎ जगभरात स्थानिक नेतृत्व शाळा, रुग्णालये, नर्सिंग‎होम्स आणि सार्वजनिक ठिकाणे अति उष्णता तसेच‎इतर हवामान धोक्यांपासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी‎अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करत आहे. सावलीची‎व्यवस्था, ग्रीन रूफ आणि नैसर्गिक कूलिंग सिस्टिम्स‎वाढत्या तापमानाप्रति शहरांची क्षमता वाढवू शकतात,‎ज्याचा सर्वात जास्त लाभ मुले, वृद्ध आणि इतर‎संवेदनशील गटांना मिळतो. आज जगातील अनेक‎मोठ्या शहरांमध्ये हरितगृह वायू उत्सर्जन घटले आहे,‎तर त्यांची लोकसंख्या सतत वाढत राहिली आहे.‎याशिवाय, सर्व प्रकारची शहरे मिळून त्या प्रगतीला‎अधिक वेगवान करण्यासाठी सहकार्य करत आहेत, जी‎त्यांनी वेगवेगळ्या स्तरांवर साध्य केली आहे.‎ गेल्या दशकात ग्लोबल कोवेनंट ऑफ मेयर्स फॉर‎क्लायमेट अँड एनर्जी (जीसीओएम) 150 देशांच्या‎14,000 पेक्षा जास्त शहरे आणि स्थानिक सरकारांच्या‎युती म्हणून विकसित झाले आहे, जे एक अब्जापेक्षा‎जास्त लोकांचे प्रतिनिधित्व करते. यामध्ये भारताचीही 29‎शहरे सामील आहेत आणि सर्वात नवीन सदस्य‎तिरुवनंतपुरम आहे. याच्या अनेक सदस्य शहरांनी‎त्यांच्या सरकारांच्या तुलनेत अधिक महत्त्वाकांक्षी‎हवामान ध्येये स्वीकारली आहेत आणि ती अधिक‎वेगाने साध्य करण्याच्या दिशेने पुढे गेली आहेत. तरीही,‎जर त्यांना अधिक सहकार्य मिळाले तर ती अधिक‎वेगाने आणि अधिक व्यापक स्तरावर काम करू‎शकतात. त्यांना तांत्रिक तज्ज्ञता आणि निधीपर्यंत‎पोहोचण्याची तातडीची गरज आहे. अनेक स्थानिक‎स्वराज्य संस्थांकडे अजूनही इतकी संसाधने नाहीत की‎त्या हवामान प्रकल्पांची ओळख, विकास आणि‎अंमलबजावणी करू शकतील. भागीदारीतून या गरजा‎पूर्ण करता येऊ शकतात. सिटी क्लायमेट फायनान्स गॅप‎फंड – ज्याला जीसीओएम आणि जागतिक बँकेचा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पाठिंबा प्राप्त आहे – आधीच अशा प्रकल्पांचा विकास‎करण्यासाठी शहरांना मदत करत आहे, जे गुंतवणुकीला‎आकर्षित करू शकतील आणि लोकसंख्येला लाभ‎पोहोचवू शकतील. गेल्या काही वर्षांत याने 1,400 पेक्षा‎जास्त शहरांना हवामानविषयक महत्त्वाकांक्षांना‎व्यावहारिक कृतीत बदलण्यास मदत प्रदान केली आहे.‎ राष्ट्रीय सरकारे आता हवामान बदलाचा सामना‎करण्यात शहरांची क्षमता वेगाने स्वीकारत आहेत. पण‎याला केवळ सुरुवात मानले पाहिजे. सर्वात यशस्वी‎हवामान-धोरणे तीच असतात, ज्यांचा परिणाम लोक‎त्यांच्या रोजच्या जीवनात पाहू आणि अनुभवू शकतात,‎म्हणजे स्वच्छ हवा, अधिक सुरक्षित रस्ते, विजेचे कमी‎बिल, अधिक आरोग्यदायी घरे आणि‎अति-हवामानापासून अधिक चांगली सुरक्षा.‎ (@प्रोजेक्ट सिंडिकेट)‎ लोक रोजच्या जीवनात अनुभवू शकतात.‎तिच खरी हवामान धोरणे म्हटली‎पाहिजेत. म्हणजे स्वच्छ हवा, सुरक्षित रस्ते,‎विजेचे कमी बिल, अधिक आरोग्यदायी‎घरे,तीव्र हवामानापासून चांगली सुरक्षा.‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत