Headlines

भारतीय संघ इंग्लंडनंतर श्रीलंका दौऱ्यावर, BCCIकडून कसोटी मालिका जाहीर; कधी आणि कुठे जाणून घ्या


IND vs SL Test Series Schedule : बीसीसीआयने इंग्लंडनंतर भारतीय संघाच्या पुढील दौऱ्याची घोषणा केली आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. हे सामने कधी, केव्हा आणि कुठे होणार जाणून घ्या.

IND vs SL Tour
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय संघ आता इंग्लंड दौऱ्यावर असून टी-२० आणि वन डे मालिका होणार आहे. ५ टी-२० सामने आणि ३ वनडे सामने झाल्यावर भारताचा श्रीलंका दौरा असणार असून त्यासाठीचे बीसीसीआयने पुढील श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. श्रीलंका दौऱ्यामध्ये भारतीय संघाचे दोन कसोटी सामने असणार आहेत. दोन कसोटी सामने नेमके केव्हा असणार जाणून घ्या.

श्रीलंका दौऱ्याची घोषणा

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा अखेरचा सामना १९ जुलैला असणार आहे. त्यानंतर भारताचा श्रीलंका दौरा असणार आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या दोनमधील पहिला कसोटी सामना १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्टमध्ये असणार आहे. त्यानंतर पुढचा सामना २३ ऑगस्टला होणार असून हे दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी दहा वाजता सुरू होणार आहेत. वेळेबाबत अद्याप अधिकृत अशी माहिती दिली नाही.
Maharashtra TimesIND vs ENG 1st T20 : आयर्लंडविरूद्ध श्रेयस अय्यर फेल, इंग्लंडमध्ये बॅटने कडक रिप्लाय देत खास विक्रम, भारताचा पहिलाच कॅप्टन
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारताला आपले आव्हान ठेवण्यासाठी श्रीलंकेमध्ये होणारी दोन सामन्यांची मालिका महत्त्वाची असणार आहे. आता मागे घरच्या मैदानावर भारताला दक्षिण आफ्रिका संघाने पराभूत केले होते. भारताने या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये ९ सामन्यांमध्ये ४ सामने जिंकले होते. कसोटी पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ टॉप तीनमध्ये आहेत. त्यामुळे कमबॅक करण्यासाठी भारताला ही मालिका जिंकावी लागणार आहे. आता भारतीय संघाने अफगाणिस्तानसोबत एक कसोटी सामना खेळला होता. त्यामध्ये भारताने सहज विजय साकारला होता पण त्या विजयाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्य ग्राह्य धरता येणार नव्हते. या एकमेक कसोटीमध्ये अफगाणिस्तानविरूद्ध अनेक युवा खेळाडूंनी पदार्पण केले होते. यामधील मानव सुथार हा सात विकेट घेत सामनावीर ठरला होता.
Maharashtra TimesRavi Shastri : आयर्लंडविरुद्ध नाही, इंग्लंडविरुद्धही नाहीच; वैभवच्या पदार्पणाबाबत तारीख पे तारीख, माजी कोच रवी शास्त्री भारतीयांच्या मनातलं थेट बोलले

भारत वि. श्रीलंका कसोटी सामने वेळापत्रक

  • पहिला कसोटी सामना- १५ ऑगस्ट २०२६ ते १९ ऑगस्ट २०२६ (गॉल)
  • दुसरा कसोटी सामना- २३ ऑगस्ट- २०२६ ते २७ ऑगस्ट २०२६ (कोलंबो)

भारत-श्रीलंका हेड टू हेड (श्रीलंका)

दरम्यान, श्रीलंकेमध्ये भारताचा रेकॉर्ड इतकाही खास नाहीये. कारण २७ सामन्यांमध्ये भारताला ९ मध्येच विजय मिळवता आले आहे. पण ७ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला असून ११ सामने अनिर्णित राहिले. त्यामुळे शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतीय संघासमोर श्रीलंकेमधील दोन कसोटी सामने आव्हानाप्रमाणेच असणार आहेत.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा