Headlines

चांदूर बाजारच्या प्रगतिशील शेतकऱ्याचा सन्मान:उमेश बगणे यांना वसंतराव नाईक पुरस्कार




चांदूर बाजार तालुक्यातील शहापूर येथील प्रगतिशील शेतकरी उमेश रामराव बगणे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा श्री वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब, उत्पादन वाढ, गुणवत्तापूर्ण पीक व्यवस्थापन आणि प्रयोगशील शेतीच्या माध्यमातून बगणे यांनी राज्यभर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेती केवळ व्यवसाय नसून समाजाला दिशा देणारे कार्य आहे, या तत्त्वावर ते काम करतात. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला होता. मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कृषी मंत्री दत्ता भरणे उपस्थित होते. उमेश बगणे यांना यापूर्वीही कृषी क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, शेतकरी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध स्तरातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत