Subodh Bhave to play Gondavalekar Maharaj role:अभिनेता सुबोध भावे सध्या चर्चेत आला आहे. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो एका खास भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक आणि चरित्रपटांमध्ये आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आता एका अध्यात्मिक संताच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही महिन्यांपूर्वी सुबोधनं ‘नीम करोली बाबा’ यांच्या आयुष्यावर बेतलेल्या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. आता तो गोंदावलेकर महाराजांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामेच्या आगामी शॉर्टफिल्ममध्ये सुबोध भावे गोंदावलेकर महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. याचा फर्स्ट लुक देखील आता समोर आलाय. अर्थवनं एक खास पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितलंय.
Ankush Choudhary: पूर्णपणे नवीन आणि लक्षात राहील असा नवीन विनोद निर्माण करणं मोठं आव्हान, ‘मामा’च्या भूमिकेबद्दल स्पष्टच बोलला अंकुश चौधरीकाय आहे अथर्व सुदामेची पोस्ट? गोंदवलेकर महाराजांवर एक शॉर्ट फिल्म करायची… हा विचार माझ्या मनात खूप दिवसांपासून होता.ज्या महाराजांना मी मनापासून मानतो, ज्यांच्यावर माझी नितांत श्रद्धा आहे, त्यांचं कार्य एका छोट्याशा प्रयत्नातून लोकांसमोर मांडावं, अशी मनापासून इच्छा होती.आणखी एक इच्छा होती… महाराजांची भूमिका अशा व्यक्तीने साकारावी, ज्यांना मी स्वतः तितकाच मानतो. ते नाव म्हणजे सुबोध भावे सर.मी त्यांना स्क्रिप्ट पाठवली. ती त्यांना आवडली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला.
सरांच्या अभिनयाबद्दल काय बोलणार… ते फक्त अनुभवायचं असतं.शूट अतिशय सुंदर पार पडलं.सुबोध सरांचा मला फोन आला. त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला,“झालं ना सगळं तुझ्या मनासारखं? जे डोक्यात होतं, तसं झालं ना?”मी म्हणालो,“हो सर… अगदी मनासारखं झालं.”मग मी सहज त्यांना मानधनाबद्दल विचारलं. त्यावर ते हसले आणि म्हणाले,ह्या गोष्टीचा काही संबंध नाही.“अरे, तू काहीतरी चांगलं काम करतोयस… कर. मी आहे.”हे वाक्य ऐकल्यावर काही क्षण मी निःशब्द झालो.कारण आयुष्यात जेव्हा जेव्हा मी एखादं चांगलं काम करण्यासाठी पाऊल टाकतो, तेव्हा मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यातून मला नेहमी असंच वाटतं…“तू काहीतरी चांगलं काम करतोयस… कर. मी आहे.” Samir Choughule: ‘किती पैसे मिळाले या पोस्टसाठी? तुम्हाला मिळतात त्या पेक्षा थोडे जास्त’, आंदोलन आणि समाजातील असंवेदनशीलतेवर समीर चौघुलेंची जळजळीत पोस्ट
त्या दिवशी ते शब्द सुबोध सरांच्या तोंडून ऐकले… पण मला त्यात गोंदवलेकर महाराजांचाच आशीर्वाद ऐकू आला.या शॉर्ट फिल्ममुळे माझ्यासाठी दोन व्यक्ती एकत्र आल्या.एक माझे आराध्य गोंदवलेकर महाराज… आणि दुसरे सुबोध भावे सर.या दोघांप्रती मनापासून कृतज्ञ.
दरम्यान, पूर्णब्रम्ह असं या शॉर्ट फिल्मचं नाव असून याचा एक टीझर व्हिडिओ देखील अथर्वनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सुबोधच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘वीन दोघांतली ही तुटेना’ मालिकेतून टेलिव्हिजनवर पुनरागमन करत सुबोध झी मराठीवरील ‘वीन दोघांतली ही तुटेना’ या कौटुंबिक आणि संवेदनशील मालिकेत ‘समर राजवाडे’ ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. तसंच त्याचा बोल बोल राणी सिनेमाही नुकताच प्रदर्शित झालाय.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा