Headlines

अमिताभ कांत यांचा कॉलम:आपल्या संस्कृतीची उत्तम गाथा‎जगाला समजून सांगावी लागेल‎




‎‎‎‎‎‎‎‎‎‎मला जगातील वेगवेगळ्या संस्कृतींशी जोडलेली महान‎संग्रहालये पाहण्याची संधी मिळाली. अलीकडेच जेव्हा‎मी गिझाचे पिरॅमिड, अथेन्सचे अ‍ॅक्रोपोलिस आणि‎भूमध्यसागरीय किनाऱ्यावर बनलेले बिब्लियोथेका‎अलेक्झांड्रिना (ग्रंथालय) पाहिले, तेव्हा तिथले‎ऐतिहासिक महत्त्व पाहून मी भारावून गेलो. गिझामधील‎ग्रँड इजिप्शियन म्युझियममध्ये जागतिक दर्जाचे संवर्धन,‎विचारपूर्वक तयार केलेली रचना आणि जिवंत कथांच्या‎माध्यमातून इजिप्तच्या 5 हजार वर्षे जुन्या संस्कृतीशी‎संबंधित 1 लाखांहून अधिक प्राचीन संस्कृती जतन केली‎गेली आहे. बिब्लियोथेकामध्ये ज्ञानाचे संवर्धन‎करण्यासाठी केलेली गुंतवणूक स्पष्टपणे दिसून येते.‎ भारताचा सांस्कृतिक वारसादेखील तितकाच समृद्ध‎आहे. सिंधी संस्कृतीच्या सुनियोजित शहरांपासून ती‎स्मारके, हस्तलिखिते, मंदिरे, किल्ले आणि पुरावशेष ‎‎यांसारख्या जगातील अतिशय समृद्ध ऐतिहासिक ठेवी ‎‎आपल्याकडे आहेत. मात्र, जेव्हा कधी माझ्या डेस्कवर‎पर्यटन किंवा शहर विकासाशी संबंधित मोठ्या प्रकल्पांची‎कोणतीही फाइल येते, तेव्हा ती एकाच समस्येत अडकून‎पडते. आपल्याकडे सांगण्यासाठी खूप कथा आहेत, मात्र‎त्या मांडणारी पुरेशी संस्थांची साधने नाहीत. आपले‎सर्वोत्कृष्ट पुरावशेष हे संग्रहालयातच कैदेत आहेत.‎उदाहरणार्थ, कोलकात्याच्या इंडियन म्युझियममध्ये कला,‎पुरातत्त्व आणि नैसर्गिक इतिहासाशी संबंधित 25 लाख‎वस्तू आहेत, तर नवी दिल्लीच्या नॅशनल म्युझियममध्ये 2‎लाखांहून अधिक पुरावशेष संग्रहित आहेत. मात्र या‎संग्रहाचा अगदी लहानसा भागच प्रदर्शनासाठी ठेवला‎जातो व त्याचा मर्यादितच वापर केला जातो.‎ खरं तर आपण कधीही तितक्या महत्त्वाकांक्षेने आपल्या‎या संस्थांमध्ये गुंतवणूक केलीच नाही, जी आपल्या महान‎वारशाचे जतन करण्याचे, त्यांचे स्पष्टीकरण देण्याचे आणि‎ते देश-जगाला सांगण्याचे काम करेल. आपले म्युझियम,‎आर्काइव्हज आणि साइट इंटरप्रिटेशन सेंटर अफाट‎शक्यतांनी परिपूर्ण आहेत. मात्र त्यांना गांभीर्यपूर्वक‎संवर्धन, उत्तम क्युरेशन, मजबूत डिझाइन आणि अधिक‎कल्पकतेची गरज आहे. तरच ते त्या संस्कृतीला साजेशा‎स्वरूपात तयार होऊ शकतील, ज्याचे ते प्रतिनिधित्व‎करतात. नॉर्थ-साउथ ब्लॉकला राष्ट्रीय संग्रहालयात‎बदलण्याची योजना या गोष्टीचे प्रतीक आहे की, संस्कृती‎हा राष्ट्राच्या मूळ ओळखीसोबत संलग्न विषय आहे. याला‎जगातील सर्वात मोठ्या संग्रहालयांपैकी एक बनवण्याची‎योजना आखण्यात आली आहे. यामध्ये इमर्सिव्ह डिझाइन‎आणि डिजिटल माध्यमांद्वारे हजारो वर्षांच्या भारतीय‎संस्कृतीचा प्रवास उलगडून सांगितला जाईल.‎ अपेक्षा अशी आहे की, पुढील 3 वर्षांत कंटेंट टीम्स 8‎थीम आधारित क्षेत्रांमध्ये जवळपास 30 दालने विकसित‎केली जातील. केंद्रीय संग्रहालये, एएसआयच्या साइट्स‎आणि राज्यांच्या संग्रहालयांतून 80 हजारांपासून ते 1 लाख‎पुरातत्त्व अवशेष येथे आणले जातील. प्राचीन इतिहास‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आणि ज्ञान-परंपरांपासून ते आधुनिक भारतापर्यंतच्या‎प्रवासाच्या क्रमाने यांची मांडणी केली जाईल. आतापर्यंत‎सत्तेचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॉर्थ आणि‎साउथ ब्लॉकची ओळख आता केवळ कार्यालय आणि‎औपचारिक कार्यक्रमांपुरतीच मर्यादित राहणार नाही, तर‎एक असे ठिकाण म्हणून होईल, जिथे राष्ट्राला‎सुव्यवस्थित स्मृतींच्या माध्यमातून अनुभवता येऊ शकेल.‎येथे सिंधी संस्कृतीचे शहर, ज्ञान-परंपरा, कोणार्कचे‎सूर्य-रथ, चोलकालीन कांस्य प्रतिमा आणि संविधानाशी‎संबंधित दस्तऐवजसुद्धा प्रदर्शित केले जातील. स्पष्ट‎मानके निश्चित केली गेली तर रायसीना हिलची प्रत्येक‎गॅलरी जगातील प्रमुख संग्रहालयांची बरोबरी करू शकते.‎आपण वाराणसी, हम्पी किंवा जयपूरसारख्या शहरांत अशी‎संग्रहालये विकसित केली, जी संवर्धन, डिझाइन आणि‎सेवांच्या बाबतीत जागतिक दर्जाच्या मानकांवर खरी‎उतरतील, तर भारत स्वतःला जागतिक पर्यटन सर्किटमध्ये‎मजबूतपणे प्रस्थापित करू शकेल.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ आजचे पर्यटक आर्ट हॉलिडे, प्रायव्हेट‎म्युझियम टूर आणि क्युरेटेड प्रवास‎‎कार्यक्रमांवर बऱ्याच पैशांची उधळण करत‎आहेत. सांस्कृतिक अनुभव देणारे प्रवास‎लक्झरी ट्रॅव्हल ट्रेंडमध्ये आपले महत्त्वाचे‎स्थान राखून आहेत. अशा वेळी आपण‎कोणतीही संधी चुकवता कामा नये.‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत