Central Railway: घाटकोपर रेल्वे स्थानकावर लोकल आणि मेट्रोचे प्रवासी दाखल होतात. इंटरचेंज करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पुलावर नेहमी गर्दी असते. आता अशा प्रवाशांसाठी एक नवा डेक उभारण्यात आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुंबई उपनगरिय रेल्वेवरील घाटकोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. मध्य रेल्वेचे सर्व प्रवासी मेट्रो १ वरून घाटकोपर रेल्वे स्थानकावर दाखल होतात. फास्ट लोकलमध्ये प्रवासी अक्षरशः लटकून प्रवास करतात. दररोज गर्दीच्या वेळी स्थानकावर चेंगराचेंगरीसदृष्य स्थिती निर्माण होते. आता घाटकोपरवरील प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला आहे. घाटकोपर रेल्वेस्थानकांवरील मेट्रो प्रवाशांसाठी एक नवा प्रवेश आणि बाहेर पडण्याचा मार्ग सुरू झाला आहे.
परिचलनासाठी अतिरिक्त जागा
मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने घाटकोपर रेल्वे स्थानकात एक नवा उन्नत डेक उभारला आहे. या डेकचा पहिला टप्पा शुक्रवारपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या दक्षिण दिशेला हा १२ मीटर रुंद पूल बांधण्यात आला आहे. मेट्रो आणि लोकल प्रवाशांसाठी इंटरचेंज मिळणार आहे. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना अतिरिक्त जागा मिळणार आहे. त्यामुळे चालण्यासाठी आणि मेट्रो स्थानकातून लोकल स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे.
विद्यमान मेट्रो पुलाला रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेकडील नव्या पादचारी पुलाला जोडण्यासाठी हा ५५ मीटर लांब उन्नत डेक बांधला आहे. मेट्रो स्थानकावर थेट प्रवेश करण्यासाठी ६.१ मीटर रुंदीचा जिना उपलब्ध असेल. पहिल्या टप्प्यात प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील जिना, प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ आणि ४ वरील डबल डिस्चार्ज लँडिंग, मेट्रोला जोडणारा उन्नत डेक आणि पूर्वेकडील स्कायवॉकचा प्रवासी वापर करू शकतात. MRVCच्या मते यामुळे प्रवाशांसाठी अधिक जागा उपलब्ध होईल आणि त्यांना लवकरात लवकर रेल्वे स्थानकावरून बाहेर पडण्यासाठी मदत होण्याची शक्यता आहे. यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकावरील गर्दीवर नियंत्रण मिळवणं शक्य होईल.
दुसऱ्या टप्प्यात कसा होईल फायदा?
दुसऱ्या टप्प्यात दक्षिण टोक्याच्या पादचारी पुलाचं काम पूर्ण केलं जाईल. हा पूल पूर्ण क्षमतेने कार्यन्वित झाल्यावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना सुलभ प्रवेश मिळण्यासाठी पुलावर प्लॅटफॉर्म क्रमांक २/३, ४ आणि पूर्वेकडे अतिरिक्त पायऱ्या असतील. याशिवाय पुलावर सहा सरकते जिने आणि चार लिफ्टसुद्धा उपलब्ध असतील. संपूर्ण डेकवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, आधुनिक घोषणा प्रणाली आणि आयआयटी रुरकीच्या विद्यार्थ्यांच्या सल्ल्याप्रमाणे दिशादर्शक फलकंही लावण्यात आली आहेत.
MRVCचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास एस.वाडेकर यांच्या मते मुंबईतील उपनगरिय रेल्वेवरील पायाभूत सुविधाच्या आधुनिकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. “घाटकोपर रेल्वे स्थानकावर उन्नत डेक आणि साऊथ-एंड फूट ओव्हर ब्रिज सुरू झाल्यामुले स्थानकांच्या अभिसरणात मोठी सुधारणा होईल, मेट्रो-रेल कनेक्टिव्हीटी मजबूत होईल आणि गर्दीपासून नागरिकांना दिलासा मिळेल,” असं ते म्हणाले.
घाटकोपर रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी हा डेक आणि पूल उपयुक्त ठरेल का? रेल्वे स्थानकावरील प्रवाशांसाठी आणखी काय सुविधा सुरू केल्या पाहिजेत? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा