Headlines

६० वर्षांपासून तलाव प्रस्तावातच; वर्धा जिल्ह्यातील चामलात भीषण पाणीटंचाई, एका ड्रमसाठी तीनशेचा खर्च – wardha district chamla village facing water shortage due to non-implementation of lake proposal from 60 yrs pri


Wardha Water Crisis: तब्बल ६० वर्षांनंतरही प्रस्तावातील तलाव प्रत्यक्षात न आल्याने गावकऱ्यांना ड्रमभर पाण्यासाठी तीनशे रुपयांचा खर्च करावा लागत आहे.

wardha water crisis
wardha water crisis(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
एकनाथ चौधरी, वर्धा: चामला गावापासून तीन किलोमीटर अंतरावर जाम नदी आहे. या नदीचे पाणी अप्पर वर्धा धरणात पोहचते. छोटा तलाव बांधून हे पाणी अडविल्यास चामलासह परिसरातील दहा गावांचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. १९६५मध्ये या तलवाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तब्बल ६० वर्षांनंतरही प्रस्तावातील तलाव प्रत्यक्षात न आल्याने गावकऱ्यांना ड्रमभर पाण्यासाठी तीनशे रुपयांचा खर्च करावा लागत आहे.

पाचशे लोकवस्तीच्या चामला गावात दोन विहिरी आहेत. पाणीपुरवठा योजनेतील टाकीदेखील आहे. एका विहिरीत शेजारच्या माडेगाव येथून पाइपलाइनद्वारे पाणी आणले जाते. हे पाणी विहिरीत सोडून गावकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाते. हे पाणी आठवड्यातून काही मिनिटांसाठी येत असल्याने अडचण वाढते. आजवर शेतातील विहिरींतील पाण्यावर तहान भागविली जात होती. पण, या विहिरीही कोरड्या पडू लागल्या आहेत. काही विहिरींना पाणी असले तरी शेतकऱ्यांकडून वापराची परवानगी देण्यात येत नसल्याने अडचणीत भर पडली आहे. दूरवर या विहिरी असल्याने बैलगाडीवरून ड्रमद्वारे हे पाणी आणले जाते. यासाठी सुमारे अडीचशे ते तीनशे रुपयांचा खर्च गावकऱ्यांना करावा लागत आहे. गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. भीषण परिस्थिती असतानाही पाणीटंचाई निवारणासाठी अजूनही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. बोरखेडी, थार या गावांतही याहून वेगळी परिस्थिती नाही.
Maharashtra Timesप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! १५ मेपर्यंत ‘या’ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटविक्री बंद, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय
गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्याच्या दिवसांत ही परिस्थिती बदललेली नाही. महिलांच्या डोक्यावर हंडा, तरुणांच्या मोटारसायकलवर पाण्याच्या कॅन तर वृद्धांच्या हातात पाण्याच्या बादल्या नजरेस पडतात. सकाळ, सायंकाळी पाण्यासाठी परिसरात त्यांची धडपड सुरू असते. माणसांसाठी पाणी मिळत नसताना जनावरांसाठी कुठून आणायचे हा गावकऱ्यांसमोरील प्रश्न आहे. या समस्येला कंटाळून अनेक युवांनी गाव सोडले. पाणीप्रश्नाची धग पटवून देण्यासाठी गावकऱ्यांनी निवेदने दिली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमदार, खासदारांनाही गळ घातली. नागपुरातील प्रत्येक हिवाळी अधिवेशनात गावकरी मंत्र्यांची भेट घेऊन पाणीप्रश्न मांडला. तरीही समस्या सुटलेली नाही. केवळ आश्वासने देण्यात आली, अशी व्यथा ग्रामपंचायत सदस्य मधुकर मुकादम यांनी मांडली.
Maharashtra TimesAnts Smuggling: मुंग्यांची चक्क टेस्ट ट्यूबमधून तस्करी; परदेशी नागरिकांना ५००० मुंग्यांसह अटक
अकोला मनपात तोडफोड
अकोला शहराला पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्यावरून संतप्त नागरिकांनी शिवसेना (उबाठा) चे नेते मंगेश काळे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर धडक दिली. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मनपाच्या जलप्रदाय विभागात तोडफोड करून संताप व्यक्त केला. महिलांनी सोबत आणलेले माठ व घागरीसुद्धा जलप्रदाय विभागाच्या अभियंत्याच्या केबिनमध्ये फोडल्या.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा