Headlines

‘सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान’ ला ग्राहक पंचप्राण पुरस्कार’ प्रदान


ओटवणे प्रतिनिधी : रक्तदान, प्लेटलेटदान, अवयवदान व देहादान आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्तघटक उपलब्ध करून देत समाजासाठी अत्यंत मोलाचे व जीवनदायी कार्य करणाऱ्या ‘सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान’ च्या समाजोपयोगी कार्याची दखल घेत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानला ‘ग्राहक पंचप्राण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुणे मावळ वडगाव येथे झालेल्या ग्राहक पंचायत अधिवेशनात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान’ ला मान्यवरांच्याहस्ते हा ‘ग्राहक पंचप्राण पुरस्कार’ प्रदान प्रदान करण्यात आला.
या अधिवेशनाच्या व्यासपीठावर उद्घाटक न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे, माजी मंत्री सुधीर मुनगुंटीवार, आमदार राजेंद्र पवार, सहकार वस्त्र उद्योगमंत्री सुभाष देशमुख, मावळचे आमदार सुनील शेळके, राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. विजय लाड, राज्य सचिव अरुण वाघमारे,राज्य संघटक सर्जेराव जाधव तसेच ग्राहक पंचायत सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या अधिवेशनात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रक्तदान, प्लेटलेटदान, अवयवदान व देहादान, रक्तदाते जोडणी आणि गरजू रुग्णांना तातडीने रक्तघटक उपलब्ध करून देण्याच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली. या राज्यस्तरीय अधिवेशनात महाराष्ट्राच्या विविध भागांतील सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. हा पुरस्कार सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा संस्थापक सदस्य सचिन गुंड, दोडामार्ग – सावंतवाडी तालुका विभागीय अध्यक्ष तथा गोवा समन्वयक व ग्राहक पंचायत वेंगुर्ला पदाधिकारी संजय पिळणकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या गौरवामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक आणि रक्तदान चळवळीला राज्यस्तरीय व्यासपीठावर विशेष मान्यता मिळाली आहे.‘रक्तदान हेच जीवनदान’ या भावनेतून कार्यरत असलेल्या प्रतिष्ठानच्या सेवाभावी उपक्रमांचे हे यश आहे. हा सन्मान सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्य, गोवा व कर्नाटक अशा विविध भागात कार्यरत असणाऱ्या सर्व पदाधिकारी तसेच सर्व सदस्यांचा तसेच हितचिंतक व सल्लागार तसेच जिल्ह्यातील सर्व मित्रसंस्था आणि रक्तपेढ्यां या सर्वांचा असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, पदाधिकारी सचीन गुंड व संजय पिळणकर यांनी सांगितले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत