Headlines

सरपंच मंगेश साबळेंच्या तडीपारीची नोटीशीनंतर गावकरी आक्रमक; पोलीस स्टेशनसमोर ठिय्या – sarpanch mangesh sable externment notice sparks protest by villagers



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांना दोन वर्षांसाठी हद्दपार (तडीपार) करण्याची नोटीस पोलीस प्रशासनाने बजावली आहे. या नोटीसवरून आता विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून मंगेश साबळे यांचं मूळ गाव असणाऱ्या गेवराई पायगा येथील नागरिक आक्रमक झाले आहेत. आमच्या सरपंचाविरोधात सूडबुद्धीने करण्यात आलेली ही कारवाई तात्काळ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शेकडो गावकऱ्यांनी गावातून दुचाकी रॅली काढत थेट वडोद बाजार पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्याच्या अंगणात शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येत ठिय्या मांडला आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत