Headlines

सगुण-निर्गुण: लागे डोळींया पाझर – daate kantha laage doliya paajhar famous composition by saint tukaram


संतांच्या चरित्रांनी झपाटून जाण्याचा हा काळ होता. माउली ज्ञानोबांचं लौकिक जीवन केवळ एकवीस वर्षांचं. माउली तुकोबांचं बेचाळीस वर्षांचं.

sagun nirgun
सगुण निर्गुण लेख(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
-श्रीधर नांदेडकर

या शब्दांच्या वारीनं जीव गुंतवून ठेवला. तंद्रीत राहिलो. संत सहवास घडला. भक्तीची वाट धरली. मन भरकटलं नाही या काळात. दृश्यांच्या प्रभावात राहिलो. चिंतनात सतत ओवी असायची. अभंग असायचा. कुठून कुठे संदर्भ लागायचे. नवं दृश्य सामोरं यायचं. अजान वृक्षावरच्या चिमण्या आठवायच्या. इंद्रायणीची आठवण व्याकुळ करायची.

काळजातून वाहणाऱ्या नदीतून उमटणाऱ्या भावलहरींनी मनात असंख्य आंदोलनं निर्माण केली. तू माउलीहून मयाळ एवढं वाचलं तरी मन तुकोबांच्या मागे धावायचं. तुकोबांची विठोबांच्या भेटीसाठी तगमग आणि आपली तुकोबांच्या भेटीसाठी. तुकोबांमध्येच आपल्या देवाची वस्ती आहे असं पुन्हा पुन्हा मनात यायचं.

माउली नामदेवराय ज्ञानेश्वर समाधी प्रसंगाचं भावपूर्ण वर्णन करतात. ‘नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ’ कालवाकालव होते मनात. माहेर हरवण्याची गोष्ट फार जिव्हारी लागते. तुकोबांना मात्र माहेरी जाण्याची तीव्र ओढ होती. त्यांनी मूळ लवकर पाठवण्यासाठी विठू माईला सतत विनवणी केली. प्रसंगी हट्ट धरला. काही वेळा दाटे कंठ लागे डोळींया पाझर अशी अवस्था व्हायची. आणि असा एक क्षण आलाच जेव्हा माउली तुकोबा देवाला पत्र लिहितात. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा |किंवा माझी सांगा काकुळती || वारकरी निरोप घेऊन जातात.

तुकोबांना आस लागून राहते ती तिकडून निरोप येण्याची. माहेरीचा काय येईल निरोप | म्हणून झोप नाही डोळां|| तुकोबांची तगमग वाढते. अंतरीचे संत आणतील गुज| निरोप तो मज सांगतील || घडी घडी मज आठवे माहेर | न पडे विसर क्षणभरी || याच अवस्थेत तुकोबांना अंतकाळाचा अदमास आला. शेवटचं कीर्तन. सर्व मंडळींना त्यांनी प्रार्थना केली. सकळही माझी बोळवण करा| परतुनी घरा जावे तुम्ही|| आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी| सकळा सांगावी विनंती माझी || वाढवेळ झाला उभा पांडुरंग| वैकुंठा श्रीरंग बोलावितो || अंतकाळी विठो आम्हासी पावला | कुडीसहित झाला गुप्त तुका॥ चारशे वर्ष माउली तुकोबांच्या शब्दांचा प्रकाश जीवनाची वाट उजळून काढतो आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा