Headlines

वडिलांसोबत शेतात गेली, बांधावर उभी; अचानक बिबट्याचा झडप अन्… 9 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत| Maharashtra Times


Leopard Attack: गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात इंदोरा निमगाव येथे वडिलांसोबत शेतात गेलेल्या ९ वर्षीय रुची पारधी हिच्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने तिला फरफटत नेले, मात्र आरडाओरड ऐकून बिबट्याने तिला सोडून दिले. उपचारादरम्यान रात्री तिचा मृत्यू झाला.

आत्याबाई सुप्रिया सुळेंची फुगडी; उद्धव-राजसह अनंत–राधिकाची हजेरी… युगेंद्र पवारांच्या लग्नाचा शाही थाट!

गोंदिया: वडिलांसोबत शेतात गेलेल्या चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केल्याची घटना तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव येथे शनिवारी सायकांळी घडली. गंभीर जखमी बालिकेला गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान रात्री तिचा मृत्यू झाला. रुची देवानंद पारधी (वय ९, रा. इंदोरा निमगाव) असे मृत बालिकेचे नाव आहे.

रुची वडिलांसोबत शेतावर गेली होती. वडील तारांचे कुंपण लावण्याचे काम करीत होते, तर रुची बांधात उभी होती. दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला काही अंतरावर फरफटत नेले. रुचीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिचे वडील व आजूबाजूच्या शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केली. यानंतर बिबट्याने रुचीला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. जखमी रुचीला उपचारासाठी गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रात्री आठ वाजता तिचा मृत्यू झाला.

Maharashtra TimesNashik Crime : ‘दादा लेकींवर लक्ष ठेवशील’; मानलेल्या भावाकडून संतापजनक कृत्य, मामाकडून दोन्ही भाचींवर अत्याचार; नाशिक हादरलं

दीड वर्षाच्या चिमुकल्यावरही हल्ला

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये ही रविवारी अशीच एक घटना समोर आली आहे यामुळे संपुर्ण देशात बिबट्यांची दहशत झाली आहे. बालरामपूर जिल्ह्यात दीड वर्षांच्या मुलाला बिबट्याने उचलून नेले, तो आईच्या शेजारी झोपलेला असताना ही घटना घडली. आरडाओरडा ऐकताच कुटुंबीय बाहेर धावले आणि मुलाला वाचवण्यासाठी बिबट्याचा पाठलागही केला, पण पोलिसांनी सांगितले की बिबट्या अंधारात मुलाला घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.

नंतर मुलाचा मृतदेह घरापासून सुमारे 150 मीटर अंतरावर, जंगलाच्या आत आढळला. ग्रामस्थांनी तात्काळ पोलिस आणि वनविभागाला माहिती दिली. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला असून वनअधिकाऱ्यांनी त्या बिबट्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

आत्याबाई सुप्रिया सुळेंची फुगडी; उद्धव-राजसह अनंत–राधिकाची हजेरी… युगेंद्र पवारांच्या लग्नाचा शाही थाट!

कुटुंब लग्नसमारंभासाठी गावात आले होते. रविवारी पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या दरम्यान ही घटना बंकतवा जंगलक्षेत्रातील रहारपुरवा झाऊहना गावात घडली. हर्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुरदासपुरवा गावातील शेषाराम हे आपली पत्नी चनवती देवी आणि मुलगा रोहित यांच्यासह नातेवाईक भगवतराम यांच्या घरी होणाऱ्या लग्नसमारंभाला आले होते.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा