Headlines

रुद्राक्ष माळ, गॉगलमध्ये भूमी पेडणेकरची देवपूजा,चाहत्यांनी केले लुकचं कौतुक पण घेतली चांगलीच शाळा – bhumi pednekar looks stunning in chic black top radiating elegance and style


भूमी पेडणेकरने रुद्राक्ष माळ आणि गॉगलसह देवपूजेतील खास लुक शेअर केला.ब्लॅक टॉपमधील तिच्या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधले.काहींनी कौतुक केले, तर काहींनी गॉगलवरून मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.

Bhumi Pednekar Viral Look
Bhumi Pednekar Viral Look
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमीच आपल्या अभिनयासोबतच हटके फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते. तिचा प्रत्येक लुक चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. नुकताच भूमी पेडणेकरचा एक खास अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. रुद्राक्षाची माळ, डोळ्यांवर स्टायलिश गॉगल आणि साधा पण आकर्षक लुकमध्ये भूमीने देवपूजा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइलचा सुंदर मिलाफ करताना दिसत आहे. गळ्यातील रुद्राक्षाची माळ तिच्या लुकला आध्यात्मिक स्पर्श देत आहे, तर गॉगलमुळे तिच्या स्टाइलमध्ये वेगळाच स्वॅग पाहायला मिळत आहे.

काळ्या रंगाच्या टॉपमध्ये भूमी खूपच सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत आहे. तिच्या या साध्या पण ग्लॅमरस अंदाजाचे अनेक चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.भूमीचा ब्लॅक टॉपमधील हा लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काळा रंग नेहमीच एलिगंट आणि क्लासी मानला जातो, आणि भूमीने तो अगदी सहजपणे कॅरी केला आहे. तिचा मिनिमल मेकअप, खुललेला चेहरा आणि आत्मविश्वासपूर्ण पोझेस यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. चाहत्यांनी तिच्या या स्टाइलला “क्लासी”, “गॉर्जियस” आणि “स्टनिंग” अशा कमेंट्स करत पसंती दिली आहे. (फोटो सौजन्य :- @bhumisatishpednekkar)

गॅगल घातल्याने चाहत्यांनी केले ट्रॉल

गॅगल घातल्याने चाहत्यांनी केले ट्रॉल

भूमीच्या या लुकवर काही चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. देवपूजा करताना गॉगल घातल्यामुळे काहींनी तिच्यावर प्रश्न उपस्थित केले आणि कमेंट्समध्ये तिची थोडीफार शाळाही घेतली. काही युजर्सनी पारंपरिक पूजेमध्ये गॉगल घालण्यावरून तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेकांनी तिच्या वैयक्तिक स्टाइलचे समर्थन करत सांगितले की, फॅशन ही प्रत्येकाच्या आवडीची गोष्ट आहे.

युनिक फॅनसाठी भूमीची ओळख

युनिक फॅनसाठी भूमीची ओळख

भूमी पेडणेकर ही फक्त अभिनयासाठी नाही तर तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. ती वेगवेगळ्या प्रकारचे आउटफिट्स आत्मविश्वासाने परिधान करते. कधी पारंपरिक साडीतील तिचा मोहक अंदाज पाहायला मिळतो, तर कधी वेस्टर्न आउटफिट्समधील तिचा ग्लॅमरस अवतार चाहत्यांना आवडतो.

ब्लॅक टॉपमधील लुक

ब्लॅक टॉपमधील लुक

ब्लॅक टॉपमधील भूमीचा हा लुक तिच्या साधेपणासोबतच स्टाइल स्टेटमेंट दाखवणारा आहे. तिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, कमी अॅक्सेसरीज आणि साध्या स्टाइलमध्येही एखादी व्यक्ती आकर्षक दिसू शकते. तिच्या या लुकने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले असून चाहते तिच्या आगामी प्रोजेक्ट्ससोबतच तिच्या फॅशन अपडेट्सकडेही लक्ष ठेवून आहेत.

हेअरस्टाईलमध्ये पूर्ण केला लुक

हेअरस्टाईलमध्ये पूर्ण केला लुक

भूमी पेडणेकरने आपल्या या खास लुकमध्ये हेअरस्टाईलनेही चार चाँद लावले. साधी पण आकर्षक हेअरस्टाईल तिच्या ब्लॅक टॉप, गॉगल आणि रुद्राक्ष माळेसोबत सुंदर दिसत होती. तिच्या एकूण लुकमध्ये ही हेअरस्टाईल महत्त्वाची ठरली असून, तिच्या स्टाइलला आणखी ग्लॅमरस आणि एलिगंट टच मिळाला आहे.

काहींनी उपस्थित केले प्रश्न

काहींनी उपस्थित केले प्रश्न

भूमीचा हा नवीन अंदाज काहींना आवडला, तर काहींनी त्यावर प्रश्न उपस्थित केले. मात्र, अभिनेत्रीने आपल्या स्टाइलने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिचा रुद्राक्ष माळ आणि गॉगलमधील हा लुक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा