Headlines

युवा संदेश प्रतिष्ठान यांच्यावतीने देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर


कणकवली : प्राथमिक विभागातून श्री पंढरीनाथ धोंडी सावंत, नाधवडे, वैभववाडी व माध्यमिक विभागातून श्री संतोष पांडुरंग सातार्डेकर, एम आर नाईक विद्यालय, कोणाळकट्टा, दोडामार्ग यांना यावर्षीचा युवा संदेश प्रतिष्ठान आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.
युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमधून एक व माध्यमिक (हायस्कूल ) विभागातून एका शिक्षकांची निवड करण्यात येते. निवड करताना कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव न मागवता विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून या शिक्षकांची प्रतिष्ठानच्या तज्ञ टीम कडून निवड करण्यात येते.
शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असून 19 जुलै 2026 रोजी कणकवली येथे सिंधुरत्न टॅलेंट सर्च मधील गुणवंत विद्यार्थी बक्षीस वितरण कार्यक्रमात या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी निवड झालेल्या दोन्ही गुणवंत शिक्षकांचे युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक मा श्री संदेश ऊर्फ गोटया सावंत आणि युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मा सौ संजना संदेश सावंत यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अधिक माहितीसाठी परीक्षा प्रमुख श्री सुशांत मर्गज सर किंवा श्री प्रमोद पवार सर यांना संपर्क साधण्याचे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत