Headlines

याला बोलताता सोच! शुभमन गिलच्या हुकमी एक्क्यासमोर श्रीलंका हतबल, मानव सुतारने सांगितली यशामागची इनसाईड स्टोरी


मुंबई : मानव सुतार आणि रवींद्र जाडेजाच्या अचूक फिरकीच्या जोरावर भारताने मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेला २८४ धावांत रोखले. तिसऱ्या दिवसअखेर भारताने पहिल्या डावात १७८ धावांची आघाडी मिळवली. श्रीलंकेकडून सोनल दिनुशाने शतक झळकावले. डावखुरा फिरकी गोलंदाज मानव सुतारने सोमवारी पहिल्या कसोटीत श्रीलंकेविरुद्ध चार विकेट घेऊन आपल्या असाधारण प्रतिभेची पुन्हा एकदा झलक दाखवली. मात्र, २४ वर्षीय सुतारच्या यशाची बीजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मधील (सीओई) मालिकापूर्व सरावात रोवली गेली होती.

सुतारने ‘सीओई’ मध्ये मोकळ्या मैदानावर वाहणाऱ्या वाऱ्याच्य वातावरणात १० दिवस कुकाबुरा चेंडूने सराव केला. हे प्रशिक्षण गॉलमधील परिस्थितीशी अगदी मिळतेजुळते होते. याचा फायदा झाल्याचे सुतारने दिवसभराचा खेळ संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. तो म्हणाला, ‘अफगाणिस्तान कसोटीनंतर मी कुकाबुरा चेंडूने सराव करत होतो. त्यामुळे माझी योजना अगदी सोपी होती. योग्य टप्प्यावर, योग्य वेगाने गोलंदाजी करणे; कारण येथील खेळपट्टीवर चांगला बाउन्स मिळतो. यामुळे योग्य लाइनवर गोलंदाजी करणे अनिवार्य ठरते.

Maharashtra TimesInd vs SL 1st Test : 178 धावांची आघाडी, श्रीलंका दबावात! पण टीम इंडियाच्या विजयात पाऊस व्हिलन ठरला तर गिल-गंभीर कोणता निर्णय घेणार?
‘सुतारने ३२ प्रथम श्रेणी सामन्यांत १४७विकेट घेतल्या आहेत. त्याला जूनमध्ये झालेल्या अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. पदार्पणाच्या कसोटीत सात विकेट घेऊन त्याने आपली चुणूक दाखवली होती. तो चेंडूला उत्तम ‘फ्लाइट’ देतो. वेगाने चेंडू टाकण्याची त्याची क्षमता असून, अचूक टप्प्यावर सातत्याने तो मारा करू शकतो. त्याची ही गुणवत्ता श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कामाला आली. त्याचे ७४ टक्क्यांहून अधिक चेंडू चांगलेच वळले. त्याने श्रीलंकेच्या लाहिरू इगलगामगे, दिनेश चंडिमल, प्रभात जयसूर्या आणि लाहिरू कुमारा यांना बाद केले. सुतार म्हणाला, ‘पहिल्या सत्रात नव्या चेंडूवर जास्तीत जास्त विकेट घेण्यावर आमचा मुख्य भर होता.’

Maharashtra TimesIND vs SL : गिलला चौथ्या दिवशी खास रणनीतीने मैदानात उतरावं लागेल; तरच मिळेल विजय! तिसऱ्या दिवशी भारत कुठे पास-कुठे फेल?
गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये ही लढत सुरू आहे. भारताच्या पहिल्या डावातील ४६२ धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या यजमान श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर महंमद सिराजने निशान फर्नांडोला शून्यावर बाद केले. यानंतर सुतारने दिनेश चंडिमलला बाद केल्यानंतर लाहिरू इगलागामगे यालाही बाहेरचा रस्ता दाखवला. फिरकीला मदत मिळत असल्याचे पाहून कर्णधार गिलने आपली तिन्ही डावखुरे फिरकी अस्त्रे मैदानात उतरवली. त्याचा सकारात्मक परिणाम झाला. कुलदीप यादवने कामिंदू मेडिसला, तर जडेजाने कर्णधार धनंजय डिसिल्वाला माघारी पाठवले.

Maharashtra TimesIND vs SL : शाब्बास पोरा! 26 वर्षाच्या देवदत्तने 167 धावांची खेळी करत रचला इतिहास; गांगुली, सचिनसह दिग्गजांना मागे टाकत बनला नंबर वन
श्रीलंकेचा निम्मा संघ ९० धावांत माघारी परतला होता. मात्र, भारताच्या मार्गात दिनुशा आणि निरोशन डिकवेला आडवे आले. या जोडीने २१७ चेंडूंत १४६ धावांची भागीदारी रचली. डिकवेलाने ११५ चेंडूंत सात चौकारांसह ८० धावा केल्या. जाडेजाने केशरा नुर्वातला बाद करून कसोटी क्रिकेटमधील ३५०वी विकेट पूर्ण केली. यानंतर दिनुशाने शतक पूर्ण केले आणि पुढच्याच चेंडूवर त्याला जाडेजाने पायचीत टिपले. त्याने १६९ चेंडूंत चार चौकार व दोन षटकारांसह १०० धावा केल्या.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत