Mulund Landfill Site: धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत एका मोठ्या जागेची आवश्यकता असल्याने ही जागा नवभारत मेगा डेव्हलरपर्स प्रा . लिमिटेडला ५ वर्षाच्या भाडेतत्वावर देण्यात येणार आहे . सुधार समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला विरोध करण्यात आला.

प्रस्तावाला विरोध
मुलुंड डम्पिंग ग्राऊंवरील १५ एकर जागेवर धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठीच्या कास्टिंग यार्डसह अन्य कामासाठी या जागेचा वापर होणार आहे. मंगळवारी सुधार समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. शिवसेना उबाठा पक्षाचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी या प्रस्तावाला विरोध असल्याचे सांगितले. भाडेतत्त्वावर जागा देताना त्याची १८१ कोटी रुपये असलेली किंमत कमी करून ९८ कोटी करण्यात आली.
हक्काच्या जमिनी खासगी विकासक, कंपन्यांना देणे योग्य नाही
ही किंमत कोणत्या धोरणानुसार ठरवण्यात आली, अशीही विचारणा केली. तर काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी, मुंबईकरांच्या हक्काच्या जमिनी खासगी विकासक, कंपन्यांना देणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गंत मुंबई महापालिकेने आतापर्यंत किती जागा दिल्या याची माहिती समितीने द्यावी, अशी मागणी करत या प्रस्तावाला विरोध केला.
विरोध करण्याची काही कारणे
मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील १५ एकर जागा ही भाडेतत्वावर देण्यास काही महत्त्वाची कारणे आहेत.
. स्वत:ची जमीन खरेदी न करता पालिकेच्या जागांचा वापर करण्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे .
. या प्रकल्पासाठी लागण्यात येणाऱ्या बांधकामाच्या साहित्य वाहतुकीसाठी येणाऱ्या गाड्याची येजा वाहतुकीची समस्या अधिक बिकट करणार आहे.
. मुलुंड हा दाट लोकवस्ती असलेला भाग आहे तिथे रेडी – मिक्स काँक्रीट प्लांटमुळे प्रदूषण वाढेल
मागणी का करण्यात आली होती
कास्ट़िंग यार्ड आणि आरएमसी प्लांट बांधकामासाठी लागणारे मोठ मोठे साहीत्य तयार करण्यासाठी एका मोठ्या जागेची आवश्यकता असल्याने मुलुंडच्या डंम्पिंग ग्राऊंडची मागणी करण्यात आली होती या ग्राऊंडची१५ एकर जागा आहे.जी ५ वर्षाच्या भाडेतत्वावर मागण्यात आली होती .

