Headlines

माजगावमध्ये १९ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा दुर्दैवी अंत; पोलिसांकडून पंचनामा


सावंतवाडी / प्रतिनिधी : माजगाव, उद्यमनगर येथील एका कंपनीत कामासाठी अवघ्या चार दिवसांपूर्वी आलेल्या १९ वर्षीय परप्रांतीय कामगाराने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. मृत कामगाराचे नाव जॉन टोपो (वय १९, रा. झारखंड) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जॉन टोपो हा आपल्या नातेवाईकांसोबत माजगाव येथील एका कंपनीत कामासाठी आला होता. तो कंपनी परिसरातील खोलीत इतर सहकाऱ्यांसोबत राहत होता. रविवारी रात्री तो खोलीत दिसून न आल्याने सहकाऱ्यांनी त्याचा शोध सुरू केला. याबाबत कंपनी मालकालाही माहिती देण्यात आली.

दरम्यान, जॉनचा शोध घेत असताना उद्यमनगर परिसरातील जंगलमय भागात त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थे आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून, आत्महत्येमागील कारणाचा तपास सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत