![]()
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली पावसाची हजेरी गुरुवारीही कायम राहिली. अनेक भागांत संततधार सुरू होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यात पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैमध्ये मात्र मान्सूनने दमदार पुनरागमन केले आहे. २३ जुलैपर्यंत राज्यात जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा ३४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली असून राज्याने मासिक सरासरी ओलांडली आहे. अर्थात ही पावसाची टक्केवारी पुणे, मुंबई, कोकणातील पावसामुळेच वाढली आहे. मराठवाड्यात अजूनही जोरदार पावसाची गरज आहे. डहाणू ते वलसाड रेल्वे वाहतूक विस्कळित नद्यांनी धोक्याची पातळी गाठल्याने डहाणू रोड ते गुजरातेतील वलसाड दरम्यान रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. शुक्रवारी पुणे घाट परिसराला रेड, नाशिकला ऑरेंज, नंदुरबार, अकोल्याला यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यातील ३५ पर्यटकांची केली सुटका गुजरातच्या वलसाडमध्ये खासगी बसने गेलेले महाराष्ट्रातील ३५ पर्यटक पुरात अडकले होते. गुजरात प्रशासनाने हेलिकॉप्टर पाठवून त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढले. या ३५ पर्यटकांपैकी १७ जण जालना तर उर्वरित संभाजीनगर व परभणी जिल्ह्यातील आहेत. देशात यंदा चेरापुंजीनंतर महाबळेश्वर,५३ दिवसांमध्ये ३२७५ मिमी पाऊस मुंबई | देशात सर्वाधिक पाऊस चेरापुंजीमध्ये पडतो. यंदाही १ जूनपासून सुरू झालेल्या पावसाळ्यात गेल्या ५३ दिवसांत म्हणजे २३ जुलैपर्यंत चेरापुंजी (मेघालय) येथे ३६११.४ मिमी पाऊस झाला आहे. त्याखालोखाल महाबळेश्वरमध्ये याच कालावधीत ३२७५ मिमी पाऊस झाला आहे.देशातील सर्वाधिक पावसांच्या ५ शहरांत मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. येथे १५०१.६ मिमी पाऊस झाला आहे. आशियावर १०,००० किमी लांबीचे ढग पसरले नवी दिल्ली । भारतावर मान्सून मेहेरबान झाल्याने २ दिवसांत सरासरीपेक्षा १७०-१८०% जास्त पाऊस झाला. पश्चिम भारत ते दक्षिण कोरियापर्यंत सुमारे १० हजार किलोमीटरपर्यंत पावसाचे ढग पसरले आहेत. त्यांचे छायाचित्र उपग्रहाने टिपले आहे. तज्ज्ञांनी त्याला क्लाऊड कॉरिडॉर असे नाव दिले आहे. जिथे ढग तिथे पाऊस हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, भारतावर ज्या भागात हा ढग दाटला आहे, तेथे पाऊस होत आहे.
त्र्यंबकेश्वरला गेल्या २४ तासांत २९९ आणि नाशिकला १३० मिमी पाऊस झाला. त्यामुळे गंगापूर धरण एकाच दिवसात ७९ वरून ९७ टक्के भरल्याने विसर्ग वाढवण्यात आला. आता जायकवाडीत पाणी येण्याची शक्यता आहे. नाशिकमधून वाहणाऱ्या गोदावरीतील प्रवाहातही वाढ झाली. यंदा प्रथमच दुतोंड्या मारुती डोक्यापर्यंत म्हणजे ९०% बुडाला आहे. पार्किंगमध्ये कार बुडाल्या
वलसाडला एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये औरंगा नदीचे पाणी शिरल्याने कार बुडाल्या.
वलसाडच्या उमरगाव तालुक्यात अवघ्या ४५ तासांत १२७० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला. वलसाड, सुरत आणि नवसारी (येथे कावेरी नदीला पूर आला) येथून आतापर्यंत १,२०० हून अधिक लोकांना वाचवले असून २२ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
Source link
महाराष्ट्रात 23 जुलैपर्यंत महिन्याच्या सरासरीपेक्षा 34 टक्के अधिक पाऊस:आज पुणे घाट परिसराला रेड, नाशिकला ऑरेंज, नंदुरबार, अकोल्याला यलो अलर्ट
