Rajeev Shukla On Sachin Tendukar And Sonal Dinusha Comparison : दोन सामन्यांच्या मालिकेतील चारही डावांत लंकेसाठी उत्कृष्ट धावा करणाऱ्या सोनल दिनुशाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली आहे. त्याची फलंदाजी पाहून BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी थेट सचिन तेंडुलकरशी तुलना केली. नेमकं काय म्हणाले शुक्ला?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत एका श्रीलंकन फलंदाजाने भारतीय गोलंदाजांना अक्षरशः रडकुंडीला आणलेले पाहायला मिळाले. या फलंदाजाचे नाव आहे सोनल दिनुशा . या संपूर्ण मालिकेत दिनुशाने धावांचा असा काही पाऊस पाडला आहे की, स्वतः भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हेदेखील त्याची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांनी या युवा फलंदाजाची तुलना थेट क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरशी केल्याने सध्या सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, सोनलच्या खेळीनेच दुसरा सामना भारताला जिंकता आला नाही. हा सामना आता ‘ड्रॉ’ झाला आहे.
सोनल दिनुशाचा टीम इंडियाविरुद्ध कहर
सोनल दिनुषा सध्या आपल्या कसोटी कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे, पण त्याने भारतीय संघाविरुद्ध ज्या प्रकारे फलंदाजी केली आहे, ते पाहता त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. गॉल येथे झालेल्या पहिल्या कसोटीत सोनलने पहिल्या डावात दणदणीत शतक झळकावले होते, तर दुसऱ्या डावात ८४ धावांची शानदार खेळी केली होती. त्याचा हा फॉर्म कोलंबो कसोटीतही कायम राहिला. कोलंबोमध्येही त्याने पहिल्या डावात शतक आणि आता दुसऱ्या डावातही १३३धावा केल्या. म्हणजेच या मालिकेतील चारही डावांत त्याने ५० पेक्षा जास्त धावा कुटून भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला आहे.
भारतीय गोलंदाजांविरुद्ध सोनल दिनुशाची ही आक्रमक आणि संयमी फलंदाजी पाहून बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला स्वतःला रोखू शकले नाहीत. मालिका संपण्यापूर्वीच त्यांनी एक्सवर (X) पोस्ट करत दिनुशावर स्तुतिसुमने उधळली आहेत. त्यांनी लिहिले आहे, “श्रीलंकेचा हा फलंदाज सोनल दिनुशाएक अत्यंत उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याची फलंदाजी पाहून सचिन तेंडुलकरची आठवण येते. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक महान कसोटीपटू बनू शकतो.” बीसीसीआयच्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्याने अशी थेट तुलना केल्याने दिनुशाच्या टॅलेंटची सध्या क्रिकेट जगतात जोरदार चर्चा सुरू आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटीचा निकाल
भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कोलंबो येथील एसएससी मैदानावर खेळला गेला. या सामन्याचा निकाल अनिर्णित राहिला आहे. तथापि, भारताने पहिला सामना जिंकल्यामुळे मालिका १-० ने जिंकली आहे. दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताला सामना जिंकण्याची संधी होती, परंतु भारतीय गोलंदाजांना श्रीलंकेच्या दुसऱ्या डावातील उर्वरित ४ विकेट्स घेता आल्या नाहीत. त्यांनी ४२९ धावा करून २०० हून अधिक धावांची आघाडी घेतली होती. या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला फॉलो-ऑन दिला होता. त्यामुळे यजमान श्रीलंकन संघासाठी या सामन्याचा निकाल विजयापेक्षा कमी नाही.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा