मुंबई : भारत आणि श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघात एकमेव बदल करण्यात आला आहे तो म्हणजे कुलदीप यादव बाहेर आहे. तर त्याच्या जागी सारांश जैन याला संधी मिळाली आहे. ३३ वर्षीय सारांश जैनचा हा पदार्पण सामना असणार आहे. पहिल्या कसोटीनंतर कुलदीपला बाहेर केले जाईल अशी चर्चा होती. पण टीम मॅनेजमेंटने त्याला खेळवणार होती, पण कुलदीपला इन्फेक्शन झाल्यामुळे तो या सामन्यात खेळत नसल्याचं गिलने सांगितले आहे.
टॉस जिंकल्यावर गिल काय म्हणाला?
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या 2–3 दिवसांत खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली राहण्याची शक्यता आहे. गॉलच्या तुलनेत हे पिच अधिक चांगले आणि फलंदाजीसाठी सोपे दिसत आहे; मात्र सामन्याबरोबर ते थोडे धीमे होऊन फिरकीला मदत करू शकते. संघाने एकूणच चांगला आणि सातत्यपूर्ण खेळ केला, मात्र काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची संधी अजून आहे. पाच दिवसांच्या कसोटीत परिपूर्ण सामना खेळणे खूप कठीण असते, असं गिल म्हणाला.
IND vs SL 2nd Test : भारत वि. श्रीलंका आज दुसरा कसोटी सामना, 3 वर्षांनी परदेशात पहिली मालिका जिंकणार, किती वाजता सुरू होणार? गौतम गंभीर यांना भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक झाल्यापासून संघाच्या अपयशासाठी कर्णधारापेक्षा जास्त टीका सहन करावी लागत आहे. आताही कसोटीतील विजयांसाठी भारतीय संघ संघर्ष करीत असतानाच गंभीरच लक्ष्य होत आहेत. ‘माझे काम संघाला विजयी करण्याचे आहे. कोणाची मते चांगली आहेत किंवा टीका कशी चुकीची आहे हे सांगणे नव्हे,’ असे गंभीर यांनी सुनावले. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या क्रिकेट कसोटीपूर्वीच्या पत्रकार परिषदेत गंभीर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा