Headlines

बांद्यात १७ जुलैला ‘आषाढ महोत्सव २०२६’; ‘सूर्यास्त सूर्योदय’ दशावतार नाटकाचे आयोजन


बांदा: प्रतिनिधी
सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, कट्टा कॉर्नर बांदा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘आषाढ महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ रोजी रात्री ठीक ७.०० वाजता ‘सूर्यास्त सूर्योदय’ या महान पौराणिक संघर्षमय संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. ​हा कार्यक्रम बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय, कट्टा कॉर्नर येथे संपन्न होईल.

​’लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत – श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर कुडाळ’ यांच्या विशेष आभारासह या संयुक्त दशावतार नाटकात कोकणातील नामवंत कलाकार विविध भूमिका साकारणार आहेत. यात
​गणपती: प्रतिक कलिंगण,
​रिद्धी सिद्धी: चंद्रकांत गावडे,
​शनि: प्रशांत मयेकर,
​शंकर: गौरव शिर्के,
​गंधर्व: सुयश ठाकूर,
​सुमाली: उदय मोर्ये,
​नारद: योगेश कोंडुरकर,
​मंगळ: सागर गावकर,
​सूर्य: नारायण आशयेकर,
​कश्यप: महेंद्र कुडव,
​इंद्र: मोरेश्वर सावंत,
​संज्ञा: गोट्या येरागी,
​निलमंदा: सुधीर तांडेल,
​या नाट्यप्रयोगाला जोड म्हणून उत्कृष्ट संगीत साथ लाभणार आहे
​हारमोनियम: मयूर गवळी
​मृदंगमणी: पियुष खंदारे
​झांज: विनायक सावंत
​बांदा आणि परिसरातील सर्व दशावतार नाट्यप्रेमी व रसिकांनी या भव्य पौराणिक नाट्यप्रयोगाचा आणि आषाढ महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, कट्टा कॉर्नर बांदा यांच्या वतीने करण्यात आले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत