England vs Argentina Football Match : फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत आज, बुधवारी मध्यरात्री इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. मात्र, दोन्ही देशांतील फुटबॉल लढतींपेक्षा मैदानाबाहेर संघर्षाचा इतिहास बघितल्यास या सामन्याच्या वेळी प्रतिस्पर्धी संघ जास्त जोषात असतील. पहिल्या सेमी फायनल सामन्यामध्ये स्पेनने फ्रान्सचा पराभव करत अंतिम फेरीत गाठली आहे. आज मध्यरात्री दुसरा संघ कोणता हे समजणार आहे.

तिकिटेही महाग
फ्रान्स आणि स्पेन या उपांत्य लढतीच्या तिकिटापेक्षा अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याच्या तिकिटाला किंमत जास्त आहे. काही तिकिटे तर दुसऱ्या उपांत्य लढतीच्या तुलनेत दुपटीने विकली जात आहेत. इंग्लंड अर्जेंटिना लढतीचे तिकीट सोमवारी रात्रीपर्यंत २ हजार ८६७डॉलरला विकले जात होते, तर फ्रान्स स्पेन सामन्याच्या तिकिटास १ हजार ३४० डॉलर भाव होता. अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी संघासाठी रचलेले नवे गाणे प्रसारित होत आहे. त्यात १९९४मध्ये अर्जेंटिनाकडून चोरलेला वर्ल्ड कप (उत्तेजक चाचणीत मॅराडोना दोष) यावेळी माल्विनास, दिएगो आणि मेस्सीची अखेरची स्पर्धा असल्याने जिंकायचा असल्याची भावना या गाण्यातून व्यक्त होत आहे.
FIFA World Cup 2026 Semi Final 1 : फिफा वर्ल्ड कप 2026चा पहिला सेमी फायनल सामना स्पेन वि. फ्रान्स, कोण मारणार बाजी? एम्बापेकडे सर्वांच्या नजरा
संघर्षास सुरुवात
आमचा संघर्ष मैदानावरच असतो, असे प्रतिस्पर्धी सांगतात. प्रत्यक्षात अर्जेंटिना संघातील खेळाडू आपल्या देशातील लोकप्रिय लोकनृत्यावर नाचले. ‘तुम्ही उड्या मारल्या नाहीत, तर तुम्ही इंग्लंडचे’ अशा अर्थाचे ते गाणे अर्जेंटिनाच्या पाठीराख्यांनी एका सुरात म्हणण्यास सुरुवात केली होती.
Argentina vs Egypt Match : इजिप्तचा अर्जेंटिनाविरूद्धचा विजय रेफ्रींनी चोरला’; न्यूयॉर्कच्या महापौरांकडून बोचरी टीका, 11 मिनिटात झालेले 3 गोल
मेस्सी प्रथमच खेळणार
लिओनेल मेस्सी इंग्लंडचा प्रथमच सामना करणार आहे. दिएगो मॅराडोनानंतरचा तो अर्जेटिनाचा फुटबॉल हिरो आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध वर्चस्व राखण्यास तो उत्सुक असेल. खरे मेस्सीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर इंग्लंड आणि अर्जेटिनात २००५ च्या नोव्हेंबरमध्ये लढत झाली. त्यात अर्जेंटिना २-३ असे पराभूत झाले होते. मात्र, त्या सामन्यास मेस्सी अगोदरच्या सामन्यातील ‘रेड कार्ड’ मुळे अपात्र ठरला होता.
Erling Haaland : विश्व फुटबॉलचा नवीन हिरो, नॉर्वेचं ‘गोल मशीन’, एर्लिंग हालँड नेमका कोण? पोरानं बापाचं नाव काढलं, संपूर्ण प्रवास जाणून घ्या
हे महत्त्वाचे
- ‘ओप्ता’ या फुटबॉलविषयक संकेतस्थळानुसार उपांत्य फेरीतील चार संघांत अर्जेंटिना जिंकण्याची शक्यता सर्वात कमी २०.६ टक्के, तर इंग्लंड जिंकण्याची २१.९ टक्के,
- अर्जेंटिना गतविजेते, तर इंग्लंडचे एकमेव विजेतेपद १९६६मध्ये
- इंग्लंडचे यंदाच्या दहा सामन्यांत सात विजय, दोन बरोबरी आणि एक पराभव, त्याच वेळी अर्जेंटिनाचा सलग १३ सामन्यांत विजय
- इंग्लंडच्या हॅरी केन सेच जूड बेलिंगहॅमचे प्रत्येकी सहा गोल. लिओनेल मेस्सीचे आठ गोल, त्यात तीन सामन्यांत पहिला गोल
- इंग्लंडने गेल्या सहापैकी तीन सामन्यांत पहिला गोल केला आहे. पूर्वार्धात ५ः५ अशी कामगिरी.
- अर्जेंटिनाचा सहापैकी पाच सामन्यांत पहिला गोल. पूर्वार्धात ६ः१.
काय निर्णायक ?
- यारेल क्वान्साह हा अपात्र तर रीस जेम्स जायबंदी यामुळे इंग्लंडसमोर बचाव, तसेच मधल्या फळीच्या निवडीचा प्रश्न.
- अर्जेटिनाचे सर्व खेळाडू तंदुरुस्तः तसेच उपलब्ध, इंग्लंडविरुद्धच्या लढतीसाठी बचावातील खेळाडू वाढवण्याचा गांभीर्याने विचार.
- प्रतिस्पध्र्थ्यांना मैदानाच्या मध्यभागीच कसे ठेवता येईल याकडे इंग्लंडचे जास्त लक्ष. या परिस्थितीत लिओनेल मेस्सी इंग्लंडविरुद्धच्या मार्ग कसा शोधणार याकडे लक्ष.
- निष्प्रभअर्जेंटिनाची आक्रमणे करण्यासाठी इंग्लंडचे प्रयत्न. त्यासाठी मधल्या फळीवर जास्त जबाबदारी, बेलिंगहॅम आणि केनने अर्जेंटिनावरील दडपण कायम ठेवल्यास बचावफळीचा जास्त कस लागणार नाही हा इंग्लंडचा विचार,
- खिस्तियन रोमेरो आणि लोगान बेली हे केन आणि बेलिंगहॅमला कसे रोखणार यावर अर्जेटिनाचे आव्हान अवलंबून असणार आहे.

