Headlines

पुणेकरांसाठी थेट विमानतळापर्यंत मेट्रो! नवा मार्ग ठरला; संपूर्ण शहरातील प्रवाशांना फायदा होणार| Maharashtra Times


Kalyaninagar-Lohegaon Metro: पुणेकरांचा लोहगाव विमानतळापर्यंत प्रवास सोपा होणार आहे. एका नव्या मेट्रो मार्गाला मंजुरी मिळाली असून शहरातील सर्व मेट्रो प्रवासी सहजपणे विमानतळपर्यंत पोहोचू शकतील.

कल्याणीनगर ते लोहगाव विमानतळ मेट्रो
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यात मेट्रो मार्गाचा विस्तार होणार आहे. हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी कल्याणीनगर स्थानक ते लोहगाव विमानतळापर्यंत नवा मेट्रो मार्ग बनणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिका आणि महा मेट्रोसह या मार्गावर मेट्रोचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी लोहगाव विमानतळापर्यंत पोहोचणं सोपं होणार आहे.

थेट विमानतळापर्यंत कनेक्टिव्हिटी

महा मेट्रोने या मार्गाची व्यवहार्यता तपासून हा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली. सर्व पर्यायांची तपासणी करूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. प्रस्तावित मार्गामुळे विमान प्रवाशांसाठी शहरांदरम्यान प्रवास करणं सोपं होणार आहे. सध्या पुण्यातील एकमेव विमानतळावर थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी नाही आहे.

प्रवाशांना येरवाडा मेट्रो स्थानकावरून लोहगाव विमानतळापर्यंत प्रवास करावा लागतो. मेट्रो स्थानकावरून प्रवासाचा दुसरा पर्याय शोधावा लागतो. खाजगी कॅबने प्रवास करणं महाग पडतं आणि वाहतूककोंडीची समस्याही वाढते. यामुळे गेल्या वर्षी मोहोळ यांनी महा मेट्रोला पुणे विमानतळाला जोडणारी मेट्रो मार्गिका तयार करण्यासाठी पर्याय शोधण्याचे आदेश दिले होते. सध्या पुणे मेट्रोचा फेज २ अंतर्गत विस्तार सुरू आहे. या विस्ताराच्या योजनेतून विमानतळापर्यंत कनेक्टिव्हिटीचा पर्याय वगळण्यात आला होता. पण आता या नव्या मार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कसा होणार फायदा?

पुणे मेट्रो सध्या दोन मार्गांवर धावते. लाइन १ (पीसीएमसी ते स्वारगेट) लाइन २ (वनाझ ते रामवाडी) या मार्गांवर मेट्रोसेवा उपलब्ध आहे. कल्याणीनगर स्थानक लाइन २ वर आहे. सिविल कोर्ट स्थानकावर लाइन १ आणि २ साठी इंटरचेंज उपलब्ध आहे. तसेच, नवीन सुरू होणाऱ्या मेट्रो लाइन ३ (हिंजवडी ते शिवाजीनगर) लाही जोडणार आहे. त्यामुळे या तिन्ही मार्गांवरील प्रवाशांना लोहगाव विमानतळापर्यंत प्रवास करता येणार आहे. शिवाय प्रस्तावित मेट्रो लाइन ४ (खडकवासला ते खराडी)सुद्धा कल्याणीनगर स्थानकाशी जोडलेलं असेल. त्यामुळे शहरातील सर्व चार मेट्रो मार्गांवरील प्रवास विमानतळापर्यंत सहजपणे पोहोचू शकतात.

Maharashtra TimesPune News: ‘पुणे मेट्रो २’चा चांदणी चौकापर्यंत विस्तार, वाहनांसाठी दुहेरी उड्डाणपुलाची शक्यता; कुठून-कसा असेल मार्ग?

या बैठकीत मोहोळ यांनी पौड फाटा ते वनदेवी मंदिरापर्यंत डबल डेकर उड्डाणपूल बांधण्याचेही निर्देश दिले. या मार्गामुळे पाच सिंग्नल जंक्शनच्या बॉटलनेक परिसरात वाहतूक कोंडी फुटण्याची शक्यता आहे. याशिवाय त्यांनी कचरा डेपोपासून चांदणी चौक मेट्रो स्थानकापर्यंत डबल डेकर उड्डाणपूल बांधण्याचेही निर्देश दिले. मेट्रो लाइन २ चा वानझ ते चांदणी चौकापर्यंत विस्तार होत आहे. या पुलावरील खालच्या भागत वाहनांची वाहतूक आणि वरील भागावरून मेट्रो मार्गिका तयार केली जाणार आहे. तसेच, शेवळेवाडी-हडपसर-कात्रज मेट्रो मार्गाचाही चांदणी चौक-वाकडपर्यंत विस्तार करण्याचे निर्देश दिले. या मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा