Headlines

पावसाळ्यात झाडे अचानक कोमेजून का जातात? खत टाकण्याची चूक अजिबात करू नका – heavy rain plant care essential waterlogging prevention tips


पावसाळा झाडांच्या वाढीसाठी अनुकूल असला तरी सततच्या मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने झाडे कोमेजू शकतात. यावेळी जास्त खत घालण्याऐवजी पाण्याचा योग्य निचरा आणि झाडांची नियमित काळजी घेणे महत्त्वाचे असते.योग्य देखभाल केल्यास पावसाळ्यातही झाडे निरोगी, तंदुरुस्त आणि जोमाने वाढतात.

Waterlogging Prevention
Waterlogging Prevention
पावसाळा हा झाडांच्या वाढीसाठी सर्वात अनुकूल ऋतू मानला जातो. भरपूर पाऊस, थंड वातावरण आणि ओलावा यामुळे झाडे जोमाने वाढतात. मात्र, अनेकदा सततच्या मुसळधार पावसामुळे बागेतील किंवा कुंडीतील झाडे अचानक कोमेजलेली दिसतात. पाने पिवळी पडणे, फांद्या सुकणे, फुले गळून पडणे किंवा संपूर्ण झाड मरून जाणे अशा समस्या निर्माण होतात. अशावेळी अनेकजण झाडांना अधिक खत घालतात, पण हीच सर्वात मोठी चूक ठरू शकते. पावसाळ्यात झाडांना योग्य काळजी आणि पाण्याचा निचरा (Waterlogging Prevention) याकडे विशेष लक्ष दिल्यास झाडे निरोगी राहू शकतात. (फोटो सौजन्य :- istock)

1

1

झाडांमध्ये दिसणारी वॉटरलॉगिंगची लक्षणे

झाडांमध्ये दिसणारी वॉटरलॉगिंगची लक्षणे

जर खालील लक्षणे दिसत असतील तर झाडांमध्ये पाणी साचले असण्याची शक्यता आहे.
पाने पिवळी पडणे
पाने गळणे
नवीन कोंब न येणे
झाड अचानक कोमेजणे
मातीमधून दुर्गंधी येणे
मुळांचा काळपट किंवा तपकिरी रंग होणे

कुंडीतील झाडांसाठी विशेष काळजी

कुंडीतील झाडांसाठी विशेष काळजी

कुंड्यांमध्ये पाणी जास्त काळ साचते. त्यामुळे त्यांची काळजी अधिक घ्यावी.
1. ड्रेनेज होल तपासा
कुंडीच्या तळाशी असलेली छिद्रे बंद नसावीत. पाणी सहज बाहेर पडले पाहिजे.
2. कुंडी थोडी उंच ठेवा
कुंडी थेट जमिनीवर ठेवण्याऐवजी स्टँडवर ठेवा. त्यामुळे अतिरिक्त पाणी लगेच बाहेर पडते.
3. पाणी देणे कमी करा
सतत पाऊस पडत असेल तर वेगळे पाणी देण्याची गरज नसते. माती तपासूनच पाणी द्यावे.
4. माती सैल करा
माती खूप घट्ट झाली असल्यास वरचा थर हलक्या हाताने सैल करावा. त्यामुळे हवा खेळती राहते.

रूट रॉट म्हणजे काय?

रूट रॉट म्हणजे काय?

सतत ओलसर मातीमध्ये बुरशी वाढू लागते. त्यामुळे झाडांच्या मुळांना रूट रॉट म्हणजेच मुळे कुजण्याचा आजार होतो.यामध्ये मुळे मऊ पडतात, काळी होतात आणि झाडाला अन्न व पाणी पुरवू शकत नाहीत.
अशा परिस्थितीत झाड वाचवण्यासाठी:
कुजलेली मुळे काढून टाका.
नवीन, कोरड्या आणि निचरा होणाऱ्या मातीत झाड लावा.
काही दिवस खत देऊ नका.आवश्यक असल्यास योग्य बुरशीनाशकाचा वापर करा.

पावसाळ्यात योग्य माती कशी असावी?

पावसाळ्यात योग्य माती कशी असावी?

झाडांची माती हलकी आणि पाणी लगेच बाहेर सोडणारी असावी.
यासाठी खालील मिश्रण उपयोगी ठरते.
40% बागेची माती
30% कंपोस्ट
20% नदीची वाळू
10% कोकोपीट
यामुळे मुळांपर्यंत हवा पोहोचते आणि पाणी साचत नाही.

झाडे वाचवण्यासाठी सोप्या टिप्स

झाडे वाचवण्यासाठी सोप्या टिप्स
  • कुंडीमध्ये पाणी साचू देऊ नका.
  • माती नेहमी तपासूनच पाणी द्या.
  • ड्रेनेज होल स्वच्छ ठेवा.
  • सतत पावसात खत टाकू नका.
  • पिवळी किंवा कुजलेली पाने काढून टाका.
  • झाडांना पुरेशी हवा मिळेल याची काळजी घ्या.
  • बुरशी दिसल्यास त्वरित उपाय करा.
  • पावसानंतर कुंडीतील अतिरिक्त पाणी रिकामे करा.
मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा