![]()
आजच्या जीवनशैलीत मैत्रीचे नातेही नवे रूप घेत आहे. सामाजिक माध्यमांमुळे मैत्रीवर परिणाम झाला आहे. संपर्क वाढला तरी भावनिक जवळीक मात्र कमी झाली आहे. अनेकदा मैत्री ही केवळ वेळ घालवण्याचे साधन बनली आहे. भगवान श्रीरामांनी सुग्रीवाला मैत्रीची सहा लक्षणे सांगताना एक महत्त्वाची ओळ म्हटली होती. “जे न मित्र दुःख होहिं दुखारी.’ म्हणजे मित्राच्या दुःखाने दुःखी होत नाही, तो खरा मित्र कसा? मैत्रीही व्यायामासारखीच आहे. एका दिवसात तिचे परिणाम दिसत नाहीत. सातत्याने प्रयत्न करावे लागतात. आपण रोज स्वतःचे मूल्यमापन करतो. तसेच मैत्रीही जपण्याचा सराव वाढवावा. दररोज आपल्या मैत्रीला एक नवा आकार द्या. आपुलकीचा, करुणेचा, साथ देण्याचा, योग्य मार्ग दाखवण्याचा आणि कठीण प्रसंगी मित्राला एकटे न सोडण्याचा. बाहेरच्या जगात खरा मित्र मिळाला नाही तरी मैत्रीची ही भावना आपल्या घरातच जगता येते. जीवनसाथी हा सर्वात चांगला मित्र होऊ शकतो. आई-वडील, भाऊ-बहीणही मित्र होऊ शकतात. कारण मैत्री हे केवळ नाते नसून ती एक भावना, एक स्वाद आहे. तो प्रत्येकाने नक्की अनुभवावा.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मैत्रीला आपुलकीने आकार द्या
