Headlines

नवपिढीने गुरु-शिष्यांच्या कार्याचा आदर्श घेणे गरजेचे:चांदोरी येथे प्राचार्य डॉ. माधव देवरे यांचे प्रतिपादन‎




चांदोरी येथील के. के. वाघ कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालयात कर्मवीर काकासाहेब वाघ, सहकार महर्षी माधवराव (तात्यासाहेब) बोरस्ते आणि दानशूर काकुशेठ उदेशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. माधव देवरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुरेश भोज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच हिरालाल सानप, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, चांदोरीचे सरपंच विनायक खरात आणि माणिकराव गायखे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते त्रयींच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. प्राचार्य डॉ. माधव देवरे यांनी प्रास्ताविकात कर्मवीर काकासाहेब वाघ आणि सहकार महर्षी माधवराव बोरस्ते या गुरु-शिष्यांनी शिक्षण, सहकार आणि समाजकारण क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव केला. अध्यक्षीय भाषणात मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक शिवा पाटील गडाख यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या या थोर व्यक्तींच्या कार्याला अभिवादन करत समाजासाठी कार्य करणारी कर्तृत्ववान नवी पिढी घडण्याची गरज व्यक्त केली. यावेळी समृद्धी लोखंडे, अक्षदा सूर्यवंशी आणि दर्शना पगारे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कला विभाग प्रमुख डॉ. सविता सावंत, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. प्रवीण आहेर, विज्ञानविभाग प्रमुख पूनम हाळदे आदी उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत