दिवंगत नेते अजित पवार ज्याप्रमाणे पाहणी दौरा करायचे त्याप्रमाणेच परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या पाहणी दौऱ्याची चर्चा होत आहे. पहिल्याच नजरेत कामातील त्रुटी हेरणं आणि कामात हलगर्जीपणा आढळल्यास जागेवरच अधिकाऱ्यांना जाब विचारणं या अजित पवारांच्या कार्यशैलीची नेहमीच चर्चा व्हायची. पण आज बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या रूपात अजित पवारांची तीच झलक पाहायला मिळाली, अशी चर्चा आहे. परळीतील प्रभु वैजनाथ मंदिर परिसरात भक्तनिवासाचं बांधकाम सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले असून, आमदार धनंजय मुंडे यांनी नुकतीच या भक्तनिवासाची प्रत्यक्ष पाहणी करून कामांचा सविस्तर आढावा घेतला. पण काही कामांच्या गुणवत्तेबाबत आणि नियोजनाबाबत समाधानकारक स्थिती नसल्याचं लक्षात येताच त्यांनी नाराजी व्यक्त केली. या पाहणीदरम्यान मुंडेंनी बांधकामाचा दर्जा, भक्तांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा यांची बारकाईने पाहणी केली. पण काही कामांच्या गुणवत्तेबाबत आणि नियोजनाबाबत समाधानकारक स्थिती नसल्याचं लक्षात येताच त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय राहिलेली कामं दर्जात्मक आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.