Headlines

जुन्या बावनदी पुलावरून तरुण नदीत कोसळला


त. भा. वार्ताहर

संगमेश्वर :

तालुक्यातील बावनदी येथील जुन्या पुलावर तोल जाऊन महेश नारायण भरणकर (42, रा. रेवाळेवाडी) हा नदीत कोसळला. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संगमेश्वर पोलीस निरीक्षक मितीश केणी, पोलीस कर्मचारी जाधव, कोलगे, स्थानिक पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम हाती घेतली होती. यावेळी बावनदी परिसरात ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत