![]()
अमळनेर तालुक्यात गुरुवारी घडलेल्या दोन गावांतील वेगळ्या घटनांनी पित्याच्या नात्याचे दोन टोकाचे पैलू समोर आणले आहेत. एका घटनेत बापाने नैराश्यातून पत्नी आणि दोन मुलांसह रेल्वेखाली उडी घेत जीवन संपवले. तर दुसऱ्या घटनेत, पाण्यात बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी बापाने स्वतःचा जीव धोक्यात घातला, मात्र दुर्दैवाने त्यात दोघांचाही मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे अमळनेर तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. एका धमकीने संपला अख्खा परिवार, एकास अटक….घरात उरली केवळ वृद्ध आई टाकरखेडा येथील सामूहिक आत्महत्येप्रकरणी सीताराम ऊर्फ गटलू ताणकू भिल याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सीताराम हा सुनीलला पत्नीवरून वारंवार धमकावत होता. मध्ये आल्यास तुला आणि मुलांना मारून टाकेन, अशी धमकी तो देत होता. या सततच्या मानसिक त्रासातूनच सुनील यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सुनील यांचे वडील आधीच वारले असून, घरात आता केवळ त्यांची वृद्ध आई उरली आहे. खवशी गावात मुलाला वाचवताना पित्याचा अंत दुसरी घटना खवशी गावात घडली. येथे अण्णा एकनाथ तलवारे (३२) यांचा मुलगा वीरेंद्र हा गावातील तळ्यात बुडाला. तो तळ्यातील गाळात अडकल्याने त्याला बाहेर येता येत नव्हते. हे पाहताच वडील अण्णा यांनी क्षणाचाही विचार न करता मुलाला वाचवण्यासाठी थेट पाण्यात उडी घेतली. मात्र, तेदेखील गाळात अडकले आणि बापलेकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गावकऱ्यांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. अमळनेरमध्ये पित्याची 2 रूपे… टाकरखेडा येथे सुनील अमृत भिल यांनी त्यांची पत्नी पार्वती आणि सनी व राज या दोन मुलांसह चौघांनी रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. गुरुवारी पहाटे १ ते ४ वाजेच्या दरम्यान, सुनील हे पत्नी व दोन्ही मुलांना घेऊन घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे रुळावर गेले. तेथेच या कुटंबाने जीवनयात्रा संपविली.
Source link
जळगाव जिल्ह्यात दोन हृदयद्रावक घटनांत 6 मृत्यू:एकाची पत्नी, 2 मुलांसह आत्महत्या; दुसऱ्याने मुलासाठी प्राण गमावला
