Axar Patel News : एकदिवसीय सामन्यामध्ये आणि टी-२० मध्ये आपण कसे खेळलो? याबद्दल अक्षर पटेलने भाष्य केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात विजयासाठी महत्त्वाची खेळी केल्यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला. भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर नेमकं काय म्हणाला?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : इग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली ती अक्षर पटेल याने. भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर नुकत्याच झालेल्या टी२० मालिकेच मात्र पूर्णपणे अयशस्वी ठरला होता. काहीच दिवसांआधी निराशाजनक कामगिरी करणारा खेळाडू अचानक विनिंगचा हिरो कसा झाला. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. तर या प्रश्नाचे उत्तर खुद्द अक्षरनेच दिले आहे. त्याने सामन्यानंतर कबूल केले की, टी२० सामन्यामध्ये तो खेळत असताना जोरदार फलंदाजीच्या उद्देशाने मैदानावर येत असे, अपरण आता एकदिवसीयमध्ये तो टायमिंगवर त्याचा फोकस ठेवतो.
अक्षरने या सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने ९.०५ ओव्हर्समध्ये चार विकेट काढल्या. त्याशिवाय त्याने फलंदाजी करताना ५२ चेंडूंमध्ये पाट चौकार आणि एक षटकार ठोकला आणि ५७ धावांची नाबाद खेळी केली. त्याची अष्टपैलू खेळी काल सर्वांना पाहायला मिळाली. या खेळीमुळे त्याला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आले. कॅप्टन शुभमन गिल याच्या ८० आणि वॉशिंग्टन सुंदर याच्या ५२ धावांच्या महत्त्वाच्या योगदानामुळे भारताने चार गडी राखून आणि २८ बॉल शिल्लक असताना २५९ धावांचे लक्ष्य गाठले.
मी सातत्याने चांगले खेळण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्यासाठी अशी कामगिरी करणे हे खूप गरजेचे होते. पण हे सगळे आपोआप होत नसते. यासाठी मला सर्व फोकस करावे लागले. मी स्वतःवर विश्वास ठेवून योग्य रणणीतीने चांगल्या प्रकारे खेळलो. मला वाटतंय की, मी टी२०मध्ये बॉल जास्तच जोरात मारण्याचा प्रयत्त्नात खेळत होतो, असे अक्षरने जिओस्टारशी बोलताना सांगितले आहे.
त्याने पुढे सांगितले की, जेंव्हा शेवटच्या ओव्हर्समध्ये फलंदाजी करायची असते तेंव्हा तुमच्याकडे मोठे फटके खेळण्याशिवाय पर्याय नसतो. पण माझा वेग यावेळी कमी होता. कारण मला माहिती होतो यावेळी माझ्याकडे वेळ आहे. त्यामुळे मला फक्त टायमिंग साधायचे आहे. त्यामुळे मी बॉलला जोरात मारणं टाळलं. एकदा का तुम्हाला खेळपट्टी समजली की मग तुम्ही चांगल्या धावा करु शकता.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत अक्षर केवळ १९च धावा करु शकला होता. त्यामुळे त्याच्या या वनडेमधील कामगिरीचे कौतुक होत आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा