![]()
कन्नड शहर ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी डीवायएसपी आरती पवार यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. १३ ऑगस्टच्या मध्यरात्री गौताळा अभयारण्य परिसरात सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारा एक हायवा आणि आयशर ट्रक जप्त करत चालक व मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. गौताळा अभयारण्यातील चंदननाला येथे रात्रीच्या सुमारास विनापरवाना वाळू वाहतूक करणारा आयशर (एमएच २० जीसी ९१४७) ताब्यात घेण्यात आला. पोलिस पथकाने वाहनासह १२ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच वेळी हेडकॉन्स्टेबल संजय अटोळे, प्रवीण बर्डे, सोनवणे, वाळुंजकर व पीएसआय केशरसिंग जारवाल यांच्या पथकाने हिवरखेडा शिवारात हायवा ताब्यात घेतला. या कारवाईत २० लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही कारवायांमध्ये एकूण ३२ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, गौण खनिज कायद्यांतर्गत कन्नड शहर ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तपास डीवायएसपी आरती पवार करत आहेत.
Source link
कन्नड:वाळू वाहतूक करणाऱ्या हायवासह आयशर जप्त
