Headlines

‘एसआयआर’चा कामांना फटका ; महापालिकेतील विकासकामांचा वेग मंदावला, मनुष्यबळाची कमतरता


Pune News: महापालिकेच्या विविध विभागांमधील अधिकरी कर्मचारी ‘एसआयआर’च्या कामात व्यग्र आहेत.आणि याचाच परिणाम पालिकेला बसत आहेत. असे महापालिका आयुक्तांनीही मान्य केले आहे.

पुणे महापालिका
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. प्रतिनिधी ,पुणे :शहरात सुरू असलेल्या मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या ( एसआयआर ) कामामुळे महापालिकेतील विकासकामांचा वेग मंदावला आहे. महापालिकेच्या विविध विभागांमधील अधिकारी, कर्मचारी ‘एसआयआर’च्या कामात व्यग्र आहेत. त्याचा फटका पालिकेला बसत असल्याचे महापालिका आयुक्तांनीही मान्य केले आहे.

बहुतांश मनुष्यबळ तैनात

मतदारयाद्या निर्दोष असाव्यात, यासाठी देशभर विविध टप्प्यात ‘एसआयआर’ मोहीम राबवली जात आहे. सध्या महाराष्ट्रात ही प्रक्रिया राबवली जात आहे. पालिका क्षेत्रात हा प्रक्रिया अधिक प्रभावी पद्धतीने राबविण्यासाठी महापालिकेचे बहुतांश मनुष्यबळ तैनातकरण्यात आले आहे. या कामाचा वरिष्ठ पातळीवरून सातत्याने आढावा घेतला जात आहे.

‘एसआयआर’चे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

त्यामुळे निश्चित कालमर्यादेत ‘एसआयआर’चे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत. या संदर्भातील कामांचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनीही नुकतीच बैठक घेऊन कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना दिल्या.

कामे रखडली

महापालिकेचे बहुतांश मनुष्यबळ ‘एसआयआर’च्या कामात गुंतले आहे. परिणामी मिळकतकर, पथ, पाणीपुरवठा, ड्रेनेज, बांधकाम आणि इतर विभागांतील नियमित कामकाजावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. यामुळे क्षेत्र भेटी, अहवाल, निविदांची मंजुरी, अर्जांवरील सुनावणी, पूर्तता आदी कामे रखडली आहेत.

Maharashtra TimesNanded News : हरभरा बियाणं वाचवण्याच्या नादात दोन चिमुकल्या लेकी गेल्या, एका गोष्टीमुळे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; आई-बापाचा आकांत

विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना

त्यातच पावसामुळे रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, अतिक्रमण आणि इतर नागरी प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, बहुतांश अधिकारी-कर्मचारी ‘एसआयआर’च्या कामात व्यग्र असल्याने नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित राहत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, ‘एसआयआर’चे काम महत्त्वाचे असल्याने ते पूर्ण झाल्यानंतर सर्व विभागांना पुन्हा विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

Maharashtra TimesRamesh Mhatre : महाराष्ट्राबाहेर राहा, डोंबिवली डॉक्टर केसमधील मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना जामिनावेळी कठोर अटी, उच्च न्यायालयाची गंभीर टिप्पणी

‘एसआरए’ साठी नियुक्त महापालिका कर्मचारी

. शिक्षक १०३५ , कर्मचारी २८ – शिक्षण विभाग
. ६० कर्मचारी व १६० मुकादम – घनकचरा विभाग
. ७० कर्मचारी – बांधकाम विभाग
. २३० कर्मचारी – मिळकत आकारणी विभाग
. ४५ कर्मचारी – पाणीपुरवठा विभाग
. २९ कर्मचारी – विद्युत विभाग
. १९ कर्मचारी – भवन विभाग
. २२ कर्मचारी – पथ विभाग
. ७० कर्मचारी – सामान्य प्रशासन विभाग

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा