Headlines

एकादशीच्या दिवशी तुळशीचे रोप घरी आणा, पण लागवड आणि पाणी घालताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा – how to plant tulsi on ashadhi ekadashi follow these simple gardening tips for a healthy tulsi plant


आषाढी एकादशीला तुळशीचे नवीन रोप घरी आणणे शुभ मानले जाते.तुळशीची योग्य लागवड, माती, पाणी आणि सूर्यप्रकाशाची काळजी घेतल्यास रोप निरोगी राहते.या पवित्र दिवशी तुळस लावताना जाणून घ्या वाढीसाठी उपयुक्त खास बागकाम टिप्स.

How to Plant Tulsi on Ashadhi Ekadashi
फोटो सौजन्य :- @iStock
आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच तुळशी मातेला विशेष महत्त्व दिले जाते. अनेक घरांमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीचे नवीन रोप घरी आणून त्याची लागवड करण्याची परंपरा आहे. तुळस ही केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आरोग्य आणि घरातील सकारात्मक वातावरणासाठीही महत्त्वाची मानली जाते.मात्र तुळशीचे रोप घरी आणल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने लागवड आणि काळजी घेणे आवश्यक असते. चुकीची माती, जास्त पाणी किंवा योग्य सूर्यप्रकाश न मिळाल्यास तुळशीचे रोप लवकर खराब होऊ शकते. त्यामुळे आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी तुळशीचे रोप लावताना या खास बागकाम टिप्स नक्की लक्षात ठेवा.(फोटो सौजन्य :- @iStock)

तुळशीचे रोप लावण्यासाठी योग्य वेळ आणि जागा

तुळशीचे रोप लावण्यासाठी योग्य वेळ आणि जागा

तुळशीचे रोप लावण्यासाठी सकाळची वेळ शुभ आणि योग्य मानली जाते. सकाळी स्नान करून स्वच्छ जागी तुळशीचे रोप लावावे. घराच्या अंगणात, बाल्कनीत किंवा खिडकीजवळ अशी जागा निवडावी जिथे रोपाला दररोज किमान 4 ते 6 तास सूर्यप्रकाश मिळेल. तुळशीला सूर्यप्रकाशाची गरज असते. कमी प्रकाशाच्या ठिकाणी ठेवल्यास पाने पिवळी पडू शकतात आणि रोपाची वाढ मंदावते.
तुळशीसाठी योग्य कुंडी कशी निवडावी?
तुळशीचे रोप लावताना कुंडीची निवडही महत्त्वाची आहे. मध्यम आकाराची मातीची कुंडी तुळशीसाठी उत्तम मानली जाते. मातीच्या कुंडीमध्ये हवा खेळती राहते आणि अतिरिक्त पाणी सहज बाहेर पडते. कुंडीच्या तळाशी पाणी बाहेर जाण्यासाठी छिद्र असणे आवश्यक आहे. पाणी साचून राहिल्यास तुळशीच्या मुळांना नुकसान होऊ शकते.

तुळशीसाठी योग्य मातीचे मिश्रण

तुळशीसाठी योग्य मातीचे मिश्रण
  • तुळशीच्या चांगल्या वाढीसाठी सुपीक आणि पाण्याचा निचरा होणारी माती आवश्यक असते.
  • तुळशीसाठी तुम्ही खालील मिश्रण वापरू शकता
  • 50 टक्के सामान्य बागेतील माती
  • 25 टक्के शेणखत किंवा कंपोस्ट खत
  • 25 टक्के वाळू किंवा कोकोपीट

तुळशीचे रोप लावण्याची योग्य पद्धत

तुळशीचे रोप लावण्याची योग्य पद्धत

सर्वप्रथम कुंडीमध्ये मातीचे मिश्रण भरावे. त्यानंतर तुळशीचे रोप हळूवारपणे कुंडीत लावावे. रोपाच्या मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.रोप लावल्यानंतर माती हलक्या हाताने दाबावी आणि थोडे पाणी घालावे. सुरुवातीच्या काही दिवसांत रोपाला जास्त पाणी देणे टाळावे.

तुळशीचे रोप कसे लावावे

एकादशीच्या दिवशी नाही तर इतर दिवशी तुळशीला किती पाणी घालावे?

एकादशीच्या दिवशी नाही तर इतर दिवशी तुळशीला किती पाणी घालावे?

तुळशीच्या रोपासाठी पाण्याचे प्रमाण योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा तुळशीला जास्त पाणी दिल्यामुळे कुंडीतील माती सतत ओलसर राहते आणि त्यामुळे मुळे कुजण्याची शक्यता वाढते. तुळशीला नेहमी गरजेनुसारच पाणी द्यावे. उन्हाळ्यात माती लवकर कोरडी होत असल्याने रोज थोड्या प्रमाणात पाणी द्यावे. मात्र पाणी देण्यापूर्वी मातीचा वरचा थर कोरडा आहे का हे तपासावे. पावसाळ्यात माती आधीच ओलसर असेल तर अतिरिक्त पाणी देणे टाळावे, कारण जास्त ओलाव्यामुळे रोप खराब होऊ शकते. हिवाळ्यात तुळशीची वाढ थोडी मंदावते, त्यामुळे या काळात पाणी कमी प्रमाणात द्यावे.

योग्य सूर्यप्रकाश द्या

योग्य सूर्यप्रकाश द्या

तुळशीच्या रोपाला भरपूर सूर्यप्रकाश आवडतो. दररोज किमान 4 ते 6 तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी कुंडी ठेवावी. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश तुळशीसाठी विशेष फायदेशीर असतो. कमी प्रकाशामुळे रोपाची पाने पिवळी पडू शकतात आणि वाढ थांबू शकते.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटील“मृणाल पाटील जनसंपर्क, प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा 8 वर्षांचा अनुभव. मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर संवेदनशील लेखन करण्यास आवडते. याशिवाय एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनलसाठी व्हिडिओचा देखील अनुभव आहे.
खास करून मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, विषेश न्युज सेलिब्रेटी मुलाखती यामध्ये विशेष आवड. वाचकांनी अधिका-अधिक माहिती देणारे लेख लिहिण्यात पारंगत. प्रत्येक गोष्ट थेट आणि अचूक पोहचवण्यात अधिक काम केले आहे. वाचकांना वेगळे काय देता येईल यासाठी सतत प्रयत्न केले आहे.

वाचनाची, सोलो ट्रॅव्हलिंगची प्रचंड आवड आहे. वेगवेगळ्या जागा पाहून तेथील मूळ संस्कृती, माणसे या गोष्टी जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता असते. “आणखी वाचा