Headlines

इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत टोपीवाला हायस्कूलचे सुयश


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी व आठवीसाठी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत खालील विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले.
इयत्ता पाचवी मधून कुमार सोहम योगेंद्र धामापूरकर हा जिल्ह्यात दहावा आला तर इयत्ता आठवी मधून कुमार आदित्य देविदास प्रभुगावकर याने जिल्हा द्वितीय क्रमांक प्राप्त केला. याचबरोबर इयत्ता पाचवी मधून जिल्ह्यात 35 वा क्रमांक कुमारी मधुरा दिपक मिठबावकर हिने पटकावला तर इयत्ता आठवी मधून ओजस रुपेश घाडीगावकर हा जिल्ह्यात विसावा आला.
या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे आणि पालकांचे मुख्याध्यापक व संस्थाचालक यांनी अभिनंदन केले आहे.
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख श्री. सुनील काळसेकर, सौ. अक्षता तांबे, श्री. सतीश बनसोडे, श्री. विपीन ठाकूर तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सौ. मयुरा भिसे, सौ. दर्शना सामंत, सौ. ज्योती बुवा, सौ. नूरजहाँ नाईक श्री. मिलिंद शिरोडकर यांचे या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत