![]()
आषाढी यात्रा काळात लाखो वारकऱ्यांच्या सुलभ दर्शनासाठी बंद केलेले राजोपचार, काकड आरती, धुपारती हे बंद करण्यात आले होते. शेकडो मैलावरून वारी करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले भाविक, वारकरी सावळे साजिरे रूप डोळा भरून पाहून परत फिरल्यानंतर दर्शन देऊन दमल
.
दि. २५ जुलै रोजी आषाढी एकादशी संपन्न झाली. दरवर्षी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, चांगला मुहूर्त पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार दि. १२ जुलै रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता. श्री विठ्ठलास लोड, श्री रुक्मिणीमातेस तक्या देण्यात आला होता. त्यामुळे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळपुजेपर्यंत बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येत होते. सोमवारी मुहूर्तानुसार विठ्ठल व रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा मंदिर समिती सदस्य प्रकाश जवंजाळ व सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते संपन्न झाली. रात्री शेजारतीवेळी देवाचा शिणवटा, थकवा घालवण्यासाठी आयुर्वेदिक काढा श्रींस नैवेद्य म्हणून दाखवण्यात आला.
विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, मोत्याचा तुरा, नाम निळाचा, दंडपेट्या जोड मोठा, हिऱ्याची कंगन जोड, शिरपेच मोठा दहा लोक असलेला, बाजीराव कंठी, मोत्याची कंठी दोन पदरी, मोठी एक पदरी पदकास लोलक असलेली, मस्त्य जोड, तोडे जोड, सूर्य कळ्यांचा हार, पैंजण जोड, अष्टपैलू मण्याची कंठी, आठ पदरी तुळशीची माळ, तसेच श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्य जोड, तोडे जोड, चांदवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळ, लक्ष्मी हार, पुतळ्याची माळ, मोहरांची माळ, हायकोल, सरी कंबर पट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले.
आजपासून श्री विठ्ठलास व श्री.रूक्मिणी मातेस पहाटे होणारी काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व राजोपचार परंपरेनुसार सुरू करण्यात येत आहेत. या पूजेच्या वेळी मंदिरात सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, प्रकाश जवंजाळ, विभाग प्रमुख भीमाशंकर सारवडकर, सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी व पांडुरंग दशपुत्रे व पौराहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.
