Headlines

आयुष्यात हर्षदा मम्माचं खास स्थान असणाऱ्या संजय जाधवांच्या मुलीला पाहिलंत का? नात्यांचा सन्मान जपणारं खास घर – marathi director sanjay jadhav home inside photos get home decor ideas


संजय जाधव यांच्या घराची खरी खासियत केवळ त्याची सजावट नाही, तर त्या घरात असलेली नात्यांचा उबदारपणाची भावना आहे. नाते जपत त्यांनी घराला फक्त सुंदर जागा न ठेवता भावनांचं स्थान दिलं आहे.

Sanjay Jadhav House
फोटो सौजन्य :- @sanjaysjadhav
मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक संजय जाधव हे त्यांच्या कलात्मक दृष्टीसाठी ओळखले जातात. कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुंदर कथा मांडणाऱ्या या दिग्दर्शकाच्या वैयक्तिक आयुष्यातही नात्यांना तितकंच महत्त्व आहे. प्रसिद्धी, यश आणि व्यस्त वेळापत्रक यापलीकडे जाऊन कुटुंबासाठी वेळ काढणारे संजय जाधव यांचं घर म्हणजे केवळ राहण्याची जागा नसून प्रेम, आठवणी आणि भावनांनी सजलेलं एक खास विश्व आहे.

संजय जाधव यांची मुलगी ध्रिती ही त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. वडील म्हणून संजय जाधव यांनी तिला नेहमी प्रोत्साहन दिलं आहे. तिच्या आवडी-निवडी, कलागुण आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी कुटुंबाने दिलेला आधार महत्त्वाचा ठरला आहे.नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिने सांगितले की ध्रितीच्या आयुष्यात हर्षदा मम्माचं स्थानही खूप खास आहे. आयुष्य प्रेम, विश्वास आणि मैत्रीवर उभं असतं. घरात मिळणारे संस्कार आणि प्रेम यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार मिळतो. संजय जाधव यांच्या कुटुंबातही नात्यांमधील हीच जिव्हाळ्याची निखळ मैत्रीचा भावना पाहायला मिळते.

कलाकारांच्या घरांबद्दल चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. घराची सजावट, तिथला साधेपणा, आवडीनिवडी आणि कुटुंबातील वातावरण याबद्दल जाणून घेण्याची इच्छा अनेकांना असते. संजय जाधव यांच्या घराची खासियत म्हणजे त्यातील आलिशानपणापेक्षा जाणवणारी आपुलकी. प्रत्येक कोपऱ्यात कुटुंबाशी जोडलेल्या आठवणींचा स्पर्श जाणवतो. (फोटो सौजन्य :- @sanjaysjadhav)

यशाची कहाणी सांगणारा खास कोपरा

यशाची कहाणी सांगणारा खास कोपरा

घरात पुरस्कारांसाठी स्वतंत्र जागा तयार करण्याची कल्पना आजकाल अनेक कलाकार आणि सर्जनशील व्यक्तींमध्ये लोकप्रिय होत आहे. काचेच्या कपाटात, सुंदर शेल्फवर किंवा खास प्रकाशयोजनेसह ठेवलेले पुरस्कार घराची शोभा वाढवतात.संजय जाधव यांच्या घरातील अशा प्रकारची मांडणी त्यांच्या चित्रपट प्रवासाची आठवण करून देणारी ठरते. प्रत्येक ट्रॉफीमागे एक कथा असते एखाद्या चित्रपटाची मेहनत, टीमचा प्रयत्न आणि प्रेक्षकांचं प्रेम.

संजय जाधव यांचे व्हाईट थीमचे घर

संजय जाधव यांचे व्हाईट थीमचे घर

व्हाईट थीम इंटिरिअरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे घरातील प्रत्येक भाग अधिक मोठा आणि खुला दिसतो. पांढऱ्या भिंती, हलक्या रंगांचं फर्निचर आणि साधी पण आकर्षक सजावट यामुळे घरात एक प्रकारची एलिगन्स जाणवते.संजय जाधव यांच्या घरात आधुनिकता आणि आराम यांचा सुंदर समतोल दिसून येतो. केवळ दिखाऊपणाला महत्त्व न देता घराला उबदारपणा देणाऱ्या गोष्टींची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे घर एखाद्या आलिशान जागेसारखं वाटत असलं तरी त्यात राहण्याची आपुलकी कायम राहते.

घरातील झोपाळा

घरातील झोपाळा

व्हाईट थीमच्या घरात झोपाळा एक वेगळाच आकर्षणबिंदू ठरतो. पांढऱ्या रंगाच्या शांत वातावरणात झोपाळ्याची रचना घराला व्यक्तिमत्त्व देते. झोपाळ्यावर ठेवलेल्या आरामदायी कुशन, मऊ उशा आणि साध्या सजावटीच्या वस्तूंमुळे हा कोपरा अधिक सुंदर दिसतो.घरातील झोपाळा केवळ सजावटीसाठी नसतो, तर तो निवांत क्षणांसाठी असतो. सकाळचा चहा, पुस्तक वाचण्याचा वेळ किंवा कुटुंबासोबत गप्पा मारण्यासाठी अशी जागा घराला अधिक जिवंत बनवते.

काचेवर केलेले हॅन्डप्रिंटचे काम

काचेवर केलेले हॅन्डप्रिंटचे काम

हॅन्डप्रिंट आर्ट म्हणजे केवळ एक डिझाइन नसून त्यामागे भावनाही जोडलेल्या असतात. काचेवर उमटलेले हातांचे ठसे हे कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि एकत्रित आठवणींचं प्रतीक बनू शकतात.विशेषतः घरातील मुलांचे छोटे हातांचे ठसे जपून ठेवण्याची कल्पना अनेकांना आवडते. मुलं मोठी झाल्यानंतरही त्यांच्या बालपणाची एक सुंदर आठवण म्हणून हे हॅन्डप्रिंट कायम राहतात.

घरातून घेता येतील काही सजावटीच्या कल्पना

घरातून घेता येतील काही सजावटीच्या कल्पना

१. पांढऱ्या रंगासोबत कॉन्ट्रास्ट द्या
संपूर्ण घर पांढरं ठेवताना त्यात लाकडी रंग, हिरव्या झाडांचा स्पर्श किंवा हलक्या रंगांच्या वस्तू वापरल्यास सजावट अधिक उठून दिसते.
२. भिंतींना द्या कलात्मक स्पर्श
सुंदर पेंटिंग्स, फोटो फ्रेम्स किंवा आठवणी जपणाऱ्या वस्तूंनी पांढऱ्या भिंतींना वेगळा लूक देता येतो.
३. आरामदायी फर्निचर निवडा
सुंदर दिसण्यासोबतच घर आरामदायी असणं महत्त्वाचं आहे. सोफा, खुर्च्या आणि इतर फर्निचर निवडताना आरामाला प्राधान्य द्या.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा