R Ashwin on Rohit Sharma : रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांमध्ये रविचंद्रन अश्विनने बीसीसीआयच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. वरिष्ठ खेळाडूंशी थेट संवाद साधूनच निर्णय घ्यायला हवा, असे मत त्याने व्यक्त केले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : रोहित शर्मा वनडेतून निवृत्त होणार की नाही किंवा त्याला संघाबाहेर करण्यात येणार का? याबाबतच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. असे असतानाच भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने बीसीसीआयच्या निर्णय प्रक्रियेवर अप्रत्यक्षपणे सवाल उपस्थित केला आहे. संघातून कोणालाही वगळणं हा निवड समिती, कर्णधार आणि प्रशिक्षकांचा अधिकार असतो पण तरी वरिष्ठ खेळाडूंशी थेट संवाद साधून निर्णय घेतला पाहिजे, असे अश्विनने म्हटले आहे. दोन दशकांहून अधिक काळ देशासाठी खेळलेल्या क्रिकेटपटूंना सन्मानाने निरोप मिळायला हवा, असंही त्याने सांगितले आहे.
‘खेळाडूंशी थेट संवाद हवा’
आपल्या यूट्यूब शोमध्ये बोलताना अश्विन बोलत होता, “संघातून कोणालाही वगळले जाऊ शकते. त्यानंतर खेळाडूला पुन्हा संघात येण्यासाठी काय करावे लागेल, हे स्पष्ट सांगितले पाहिजे. जर पुढे संधीच नसेल किंवा वयामुळे निर्णय घ्यावा लागत असेल, तरी तो थेटपणे संवाद साधून सांगितला गेला पाहिजे.” मोठ्या कंपन्यांमध्ये जशी वरिष्ठ कर्मचाऱ्यांशी सन्मानाने चर्चा केली जाते, त्याचप्रमाणे क्रिकेटपटूंशीही वागायला हवे, असे अश्विनने सांगितले.
अश्विनच्या मते, रोहित शर्माला निवृत्त करायचेच होते, तर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर लगेच तो निर्णय घ्यायला हवा होता. 2027च्या वनडे विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेतील परिस्थितीत रोहितचा अनुभव संघासाठी महत्त्वाचा ठरला असता, असे त्याचे मत आहे. यशस्वी जैस्वाल चांगली कामगिरी करत असला तरी मोठ्या स्पर्धांमध्ये अनुभवी खेळाडूंची भूमिका वेगळी असते, असेही त्याने स्पष्ट केले.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहितकडून वनडे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. त्यानंतर तो 2027 चा विश्वचषक खेळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र आता लॉर्ड्सवर 19 जुलै रोजी होणारा इंग्लंडविरुद्धचा तिसरा वनडे सामना त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना ठरू शकतो, अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र याबाबत बीसीसीआय किंवा रोहित शर्माकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा