Yogesh Sahu KBC 18:छोट्या पडद्यावरचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या १८ व्या सीझनमध्येही एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी होताना दिसताय.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई:’कौन बनेगा करोडपती’ हा १८ सीझन सुरू आहे. या शोच्या मंचावर पुन्हा एकदा एका तरुणईचा डंका पाहायला मिळाला आहे. आयआयटी मुंबईचा टॉपर आणि यूपीएससीची तयारी करणाऱ्या २३ वर्षीय योगेश साहूनं आपल्या ज्ञानाच्या जोरावर थेट १ कोटींच्या प्रश्नापर्यंत मजल मारली. मात्र, १ कोटी रुपयांच्या अत्यंत कठीण प्रश्नावर धोका न पत्करता त्यानं खेळ सोडण्याचा म्हणजेच Quit करण्याचा निर्णय घेतला आणि ५० लाख रुपयांची मोठी रक्कम जिंकली.
काय होता १ कोटी रुपयांचा ‘तो’ प्रश्न?
हॉटसीटवर अमिताभ बच्चन यांच्यासमोर बसलेल्या योगेशकडं १ कोटींच्या प्रश्नापर्यंत पोहोचताना एकही लाईफलाईन उरली नव्हती. त्याच्यासमोर पुढील प्रश्न ठेवण्यात आला होता.
प्रश्न: १९४३ मध्ये मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर झालेली पहिली ‘इंडियन डर्बी’ बडोद्याच्या महाराजांच्या मालकीच्या कोणत्या घोड्याने जिंकली होती?
पर्याय A: प्रिन्सेस ब्युटीफुल
पर्याय B: रीगल डोमेन
पर्याय C: स्टार ऑफ ग्वाल्हेर
पर्याय D: प्रिन्स प्रदीप
अंदाज चुकलाच
तर कोणतीही लाईफलाईन शिल्लक नसल्यानं योगेशनं एलिमिनेशन पद्धतीचा वापर केला. प्रश्नात ‘घोडा’ असा शब्द असल्यामुळं ‘प्रिन्सेस ब्युटीफुल’ हे नाव घोडीचे असू शकतं, असा तर्क लावून त्याने हा पर्याय आधीच बाद केला. ५० लाख रुपये गमावण्याची भीती असल्याने त्याने खेळ सोडला. खेळ सोडल्यानंतर अंदाजानं उत्तर निवडण्यास सांगितल्यावर त्याने ‘प्रिन्सेस ब्युटीफुल’ सोडून इतर पर्याय निवडला; मात्र या प्रश्नाचं अचूक उत्तर ‘A: प्रिन्सेस ब्युटीफुल‘ हेच होतं!
छत्तीसगडमधील भाटापारा इथला रहिवासी असलेला योगेश साहू अत्यंत सामान्य कुटुंबातील आहे. त्याचे वडील चालक म्हणून काम करतात आणि महिना केवळ २०,००० रुपये कमावतात. आयआयटी मुंबईतून उत्तीर्ण झाल्यानंतर योगेशला १८ लाखांच्या नोकरीची ऑफर होती, पण देशाची सेवा करण्यासाठी आणि ‘IAS’ होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने ही नोकरी नाकारली.
खेळातून ५० लाख रुपये जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करताना योगेश म्हणाला, “माझे सर्व मित्र आज नोकरी करून कमावत आहेत. मी यूपीएससीच्या तयारीसाठी नोकरी सोडली असली, तरी कुटुंबाला मदत न करू शकल्याची एक रुखरुख होती. आता केबीसीमध्ये जिंकलेल्या या ५० लाखांमुळं माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल आणि मी अधिक लक्ष देऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकेन.” महानायक अमिताभ बच्चन यांनीही योगेशच्या या निर्णयाचे आणि त्याच्या ज्ञानाचे भरभरून कौतुक केलं असून तो लवकरच एक उत्तम प्रशासकीय अधिकारी बनेल, असा विश्वास व्यक्त केला.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा