आमदारकी गेली तरी रेल्वेमार्ग होऊ देणार नाही; प्राजक्त तनपुरे यांचा सरकारलाच इशारा – prajakta tanpure protest against rahuri shani shingnapur railway route
आमदारकी गेली तरी रेल्वेमार्ग होऊ देणार नाही; प्राजक्त तनपुरे यांचा सरकारलाच इशारा – prajakta tanpure protest against rahuri shani shingnapur railway route
आमदारकी गेली तरी शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करून रेल्वेमार्ग होऊ देणार नाही असा थेट इशारा विधान परिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे. तनपुरे यांच्या या भूमिकेमुळे राहुरी–शनिशिंगणापूर प्रस्तावित रेल्वेमार्गाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. या रेल्वे मार्गासाठी शेतजमिनींचे भूसंपादन करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने संबंधित गावांमधील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले.