Headlines

अमृत-एसआरआयएफ योजनेमुळे विद्यापीठाला मिळणार नवी दिशा:विद्यार्थी, नवउद्योजकांना स्टार्टअप, उद्योजकतेसाठी मार्गदर्शन




संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील रिसर्च अँड इन्क्युबेशन फाऊंडेशन (SRIF) आणि अमृत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अमृत-एसआरआयएफ’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेमुळे विद्यापीठाला नवीन दिशा मिळेल, तसेच विद्यार्थी आणि नवउद्योजकांना स्टार्टअप आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन मिळणार आहे. या योजनेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते आणि अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या हस्ते झाले. विद्यापीठातील विद्यार्थी, नवउद्योजक आणि स्टार्टअप्सना उद्योग व व्यवसाय क्षेत्रासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे हे या योजनेचे प्रमुख कार्य असेल. याशिवाय, इन्क्युबेशन सुविधा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि उद्योजकता विकासासाठी आवश्यक सहाय्यही या योजनेद्वारे उपलब्ध करून दिले जाईल. पात्र विद्यार्थी व नवउद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी आवश्यक पाठबळ मिळेल. नवकल्पना विकसित करणे, स्टार्टअप उभारणी, व्यवसाय मॉडेल तयार करणे, बाजारपेठेची समज विकसित करणे, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि इन्क्युबेशनच्या माध्यमातून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर या योजनेचा भर राहील. यामुळे ‘नवकल्पनेतून उद्योजकता आणि उद्योजकतेतून रोजगारनिर्मिती’ या संकल्पनेला चालना मिळेल. विद्यापीठ, अमृत आणि एसआरआयएफ यांच्या समन्वयातून सुरू झालेली ही योजना अमरावतीसह विदर्भातील स्टार्टअप व उद्योजकता परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इन्क्युबेशन सेंटरच्या चमूतील नरेश मोवाळे, रवी ढेंगळे, रणधीर घाटे आणि आदित्य किल्लेवाले यांनी विशेष परिश्रम घेतले. एसजीबीएयू रिसर्च अँड इन्क्युबेशन फाऊंडेशन (एसआरआयएफ) हे विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक आणि नवउद्योजकांच्या अभिनव कल्पनांना स्टार्टअप व उद्योगांमध्ये रूपांतरित करण्यासाठी कार्यरत आहे. अमृतच्या सहकार्यामुळे उद्योजकतेकडे वळू इच्छिणाऱ्या युवकांना विद्यापीठाच्या इन्क्युबेशन इकोसिस्टमचा लाभ मिळेल आणि त्यांच्या कल्पनांना प्रत्यक्ष व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी आवश्यक पाठबळही उपलब्ध होईल.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत