Arjun Rampal And Gabriella Demetriades Marriage:अभिनेता अर्जुन रामपाल सध्या चर्चेत आला आहे. गेल्या काही वर्षापासून लिव्हइन रिलेशनशीपमध्ये राहत असलेल्या अर्जुननं आता गर्लफ्रेंडसोबत लग्न केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही वर्षापासून लिव्हइनमध्ये राहत असलेल्या गर्लफ्रेंडसोबत अर्जुननं लग्न केलं आहे. अर्जुन रामपाल आणि दीर्घकाळापासूनची पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रिएड्स अखेर विवाहबंधनात अडकले आहेत.
गेल्या सात वर्षांपासून होते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये
अर्जुन आणि गॅब्रिएला या जोडीने गोव्यातील बार्देस येथील सब-रजिस्ट्रार कार्यालयात कायदेशीररीत्या आपल्या लग्नाची नोंदणी केली. या अत्यंत खाजगी आणि मोजक्या जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्यामुळं या स्टार कपलच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे.
दोन मुलांच्या जन्मानंतर घेतला निर्णय
२०१८ पासून अर्जुन आणि मॉडेल-उद्योजिका गॅब्रिएला एकत्र राहत आहेत. या कपलला अरिक आणि आरव ही दोन मुले आहेत. लग्नाच्या बंधनापेक्षा परस्परांमधील प्रेम आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असल्याचं मत अर्जुननं याआधी अनेक मुलाखतींमध्ये मांडलं होतं. मात्र, काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टवर गप्पा मारताना अर्जुनने त्यांचा साखरपुडा झाल्याचा उलगडा केला होता. आता त्यांनी आपल्या नात्याला कायदेशीर मान्यता देत अधिकृतपणे लग्नगाठ बांधली आहे.
अर्जुनचे हे दुसरं लग्न
अर्जुन रामपालचे हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी १९९८ मध्ये त्यानं माजी सुपरमॉडेल मेहर जेसियाशी विवाह केला होता. त्यांना माहिका आणि मायरा या दोन मुली आहेत. २१ वर्षांच्या संसारानंतर २०१८ मध्ये ते विभक्त झाले आणि २०१९ मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ सिनेमातील भूमिकेमुळं चर्चेत असलेला ५३ वर्षीय अर्जुन रामपाल आता त्याच्या वैयक्तिक आयुष्याची नवी सुरुवात करत आहे.सोशल मीडियावर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून या नवविवाहित दांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अर्जुन रामपाल याच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर त्यानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९९० च्या दशकात मॉडेलिंगपासून केली. १९९४ मध्ये त्याला ‘सोसायटी फेस ऑफ द इअर’चा मान मिळाला. मॉडेलिंगमधील यशानंतर त्यानं २००१ मध्ये राजीव राय यांच्या ‘प्यार इश्क और मोहब्बत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुरवातीच्या काळात ‘दीवानापन’ आणि ‘दिल का रिश्ता’ यांसारख्या चित्रपटांतून त्याने नायक म्हणून काम केलं. कारकिर्दीच्या सुरुवातीला काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरल्याने अर्जुनला मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला. मात्र, सहाय्यक आणि नकारात्मक भूमिका स्वीकारल्यानंतर त्याच्या करिअरला खरी कलाटणी मिळाली.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा