![]()
विधान परिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. ठाकरे गटाचे वरळीतील आमदार सचिन अहिर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत उपसभापतीपदासाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या धक्कादायक घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरांच्या अहंकारामुळेच पक्ष संपत चालला असून, आता पक्षातून केवळ आदित्य ठाकरे बाहेर पडायचे राहिले आहेत, असा घणाघाती टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेने असे अनेक धक्के पचवले असून सचिन अहिर हे काही मास लीडर नाहीत, असे ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नुसती टीका करणे आणि भाषणं करणे यामुळे पक्ष चालत नसतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष सांभाळला पाहिजे त्यांच्या पक्षातील नेते सोडून जात आहे. उद्धव ठाकरे यांना जेव्हा अंतर्गत गटबाजीबद्दल कळाले तेव्हाच त्यांनी दौरा करणे गरजेचे होते. मुख्यमंत्री असताना लोकांना भेटले असते तर इतकं काहीच घडले नसते. मुख्यमंत्रीपद मिळवण्याकरता त्यांनी हातचे सर्वच घालवले. आता पक्षातून आदित्य ठाकरे जायचे राहिलेत- बावनकुळे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सचिन अहिर जाने या पेक्षा मोठे ते काय असणार आता पक्षातून आदित्य ठाकरे जायचे राहिले आहेत. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकांनी अहंकार सोडला पाहिजे. एकनाथ शिंदे यांचा पक्ष वाढतो आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष संपतोय तो त्यांचा दोघांचा विषय आहे. यामध्ये भाजपचा काही संबंध नाही. कार्यकर्ते सोडून जात आहेत कारण त्यांना अहंकार आहे. सकाळच्या पत्रकार परिषदेमुळे हे सर्व सुरू आहे. काँग्रेस विचार स्वीकारल्याने हे हाल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजपशी युती तोंडणे, हिंदुत्वाशी फारकत घेणे, काँग्रेसचा विचार स्वीकारणे यामुळेच उबाठावर ही वेळ आली आहे. 2019 मध्ये जर मुख्यमंत्रीपदासाठी काही केले नसते तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री झाले असते. चांगल्या पद्धतीने सरकार चालले असते. मनपा हातात असते. तुम्ही स्वत:च मुख्यमंत्री झाले. घराणेशाही करणारे लोकं बरबाद झाले आहेत.
असे अनेक धक्क शिवसेनेने पचवले- राऊत असे अनेक धक्क शिवसेनेने पचवले आहेत त्यामुळे हा काही मोठा धक्का नाही. सचिन अहिर काही मास लीडर नाही, असे सुनील राऊत यांनी म्हटले आहे. तर सचिन अहिर यांच्या प्रवेशावर आमचे नेते बोलतील, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे. तर वरुण सरदेसाई म्हणाले की, आदित्य ठाकरे हे आमच्या पक्षाकडून यावर बोलतील.
Source link
सचिन अहिरांचा शिवसेनेत प्रवेश:पक्षातून आता फक्त आदित्य ठाकरे जायचे राहिलेत- बावनकुळे, असे अनेक धक्के पचवले, सचिन अहिर काही 'मास लीडर' नाहीत- राऊत
