Headlines

शाहरुख खानला मोठा दिलासा ;‘मन्नत’वर नियमभंगाचा दावा करणारी याचिका फेटाळली


Shah Rukh khan Mannat Renovation Controversy: गेल्या वर्ष दोन वर्षापासून शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. या नूतनीकरणाच्या कामात काही निमयांचं उल्लंघन झाल्याचंही म्हटलं जात होतं.

Mannat Controversy
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली : सुपरस्टार शाहरुख खान याच्या ‘मन्नत’ या वांद्रे येथील समुद्रकिनारी असलेल्या बंगल्याचे दोन मजले वाढवताना किनारा क्षेत्र नियमांचे (सीआरझेड) उल्लंघन झालं, असा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी फेटाळली.

आदर्श गृहनिर्माण घोटाळा उघडकीस आणणाऱ्या संतोष दौंडकर यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. शाहरूख खानच्या बंगल्याच्या नूतनीकरणाला परवानगी देताना महाराष्ट्र किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणानं सीआरझेडचं उल्लंघन होत असल्याकडं दुर्लक्ष केलं. त्यामुळे हरित लवादानं त्यात लक्ष घालावं, असं याचिकाकर्त्यांचे म्हणणं होतं. परंतु प्राधिकरणानं दिलेल्या परवानगीत कुठेही नियमांचे उल्लंघन झालं नसल्याचं दाखवून देऊन लवादाने दौंडकर यांची याचिका फेटाळली. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने लवादाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि याचिका फेटाळली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
तर शाहरुख खानने आपल्या वांद्रे इथल्या ‘मन्नत’ बंगल्यामध्ये दोन अतिरिक्त मजले वाढवण्यासाठी ‘कोस्टल रेग्युलेशन झोन’ अंतर्गत आवश्यक ती मंजुरी घेतली होती. मात्र, मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी या मंजुरीला आव्हान देत राष्ट्रीय हरित लवादाकडं (NGT) याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांचा असा दावा होता की, या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झालं आहे.

Maharashtra TimesAamir Khan : ‘गौरी हिंदू नाही, आमचं कुटुंब सर्व धर्मांना स्वीकारणारं’, तिसरं लग्न आणि वादावर आमिर खानची पहिली प्रतिक्रिया
पण, राष्ट्रीय हरित लवादानं या बांधकाम मंजुरीमध्ये कोणतीही अनियमितता नसल्याचे स्पष्ट करत याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं. “घरात काय करायचं हा त्यांचा अधिकार…” सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षणसर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. याचिकाकर्त्याचे वकील शोएब आलम यांनी असा युक्तिवाद केला की, “हा विषय एका मोठ्या चित्रपट अभिनेत्याशी संबंधित असल्यामुळं याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिले जाऊ नये”.

Maharashtra TimesTarini New Entry : तारिणीच्या टीममध्ये होणार नव्या बॉसची एण्ट्री, स्टार प्रवाहची खलनायिका साकारणार दबंग रोल

सध्या कुठे राहतोय शाहरुख?
मन्नत‘ बंगल्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण आणि अंतर्गत संरचनेचे काम सुरू आहे. त्यामुळं शाहरुख खान आपल्या कुटुंबासह तात्पुरता पाली हिल परिसरातील ‘पूजा कासा’ या इमारतीत दोन वर्षांसाठी भाड्यानं शिफ्ट झाला असल्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळं शाहरुखच्या हक्काच्या घराच्या विस्तारातील सर्व कायदेशीर अडथळे आता दूर झाले आहेत.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा