FIFA World Cup 2026 Final Prize Money News : फिफा वर्ल्ड कप २०२६च थरार रविवारी मध्यरात्री पार पडला. या सामन्यात स्पेनने अर्जेंटिनाला पराभवाची धूळ चारत सामना जिंकला. पराभूत झाल्यावरही अर्जेंटिनाला 318 कोटींचं बक्षीस मिळालं असून विजेत्या संघाला किती मिळाले जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : फिफा वर्ल्ड कप २०२६च्या फायनलमध्ये स्पेनने अतिरिक्त वेळेत केलेल्या एको गोलने अर्जेंटिनाचा १-० ने पराभव केला. या सामन्यात झालेल्या पराभवामुळे गतविजेत्या अर्जेंटिनाचं सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. स्पेनने तब्बल १६ वर्षांनी दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरत इतिहास रचला. विजेत्या संघाला फक्त ट्रॉफीच नाहीतर बक्कळ पैसाही बक्षीसाच्या स्वरूपात मिळणार आहे. फक्त विजेत्याच नाहीतर वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला फिफा रक्कम देतं, विजेत्या संघावर तर पैशांचा पाऊस पडतो. यंदाच्या वर्षी वर्ल्ड कपवर नाव कोरणाऱ्या स्पेनला ५० मिलियन डॉलर तर उपविजेत्या अर्जेंटिनाला संघाला ३३ मिलियन डॉलर मिळणार आहेत.कोणत्याही स्पर्धेमधील विजेत्यांना मिळणारी सर्वाधिक रक्कम आहे. यंदा ८३ मिलियन डॉलर इतके फायनलसाठी बक्षीस ठेवण्यात आले होते.
स्पेनने सुरुवातीपासूनच चेंडूवर जास्त ताबा राखला होता. सामन्याच्या उत्तरार्धात तर बराचवेळ खेळ हा अर्जेंटिनाच्या हद्दीतच सुरू होता. ‘टिकी-टाका’ या आपल्या खास शैलीत खेळ खेळताना स्पेनने दस्तुरखुद्द लिओनेल मेस्सीलाही गोल करण्यापासून रोखले होते. चेंडूचे छोटे, छोटे पास हुशारीने करत स्पेनने अर्जेटिनाची कोंडी करण्यात यश मिळवले होते. अर्जेटिनाच्या कच्च्या दुव्यांचा अभ्यास करत स्पेनने मेस्सी आणि कंपनीला गोल करण्यापासून रोखले होते. गोलप्रयत्नांत स्पेनचे १७-० असे वर्चस्व होते. त्यातील दहा प्रयत्न गोलपोस्टच्या दिशेने होते. पण १०५व्या मिनिटांपर्यंत गोल झालाच नव्हता. FIFA World Cup Winner 2026 : विजेतेपदाचे स्वप्न भंगताच अर्जेंटिनाचा पारेडेस आक्रमक, स्पॅनिश खेळाडूंना मैदानातच भिडला, व्हिडिओ समोर फेरेन टॉरस याने १०६व्या मिनिटास गोल करीत स्पेनला विजयी केले. स्पेनने या सामन्यात निर्धारित तसेच जादा वेळेत गोलसाठी एकूण २० प्रयत्न केले. त्यातील १२ ऑन टार्गेट होते. मार्टिनेझच्या भक्कम गोलरक्षणामुळे स्पेनला वर्चस्वाचे गोलात रूपांतर करण्यासाठी जादा वेळेतील उत्तरार्धापर्यंत प्रतीक्षा करावी लागली.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा