Headlines

राज्य सरकारकडून चित्रपट पुरस्कार जाहीर! प्रसाद ओकच्या शिरपेचात मानाचा तुरा, हृदयनाथ मंगेशकर, सलीम खान, राणी मुखर्जी यांचाही होणार सन्मान


Maharashtra State Film Awards : सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सन २०२५ चे चित्रपती व्ही. शांताराम व राज कपूर जीवनगौरव तसेच विशेष योगदान पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

Maharashtra State Film Awards
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – महाराष्ट्र शासनाने चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची घोषणा केली आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, अभिनेते-दिग्दर्शक आणि निर्माते प्रसाद ओक, ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा विविध पुरस्कारांसाठी सन्मान जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या पुरस्कारांची घोषणा केली असून, सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील अधिकृत शासन परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन आदी विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उल्लेखनीय कार्य करून चित्रपटसृष्टीच्या समृद्धीत मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी हे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागानं २०२५च्या चित्रपती व्ही. शांताराम आणि राज कपूर पुरस्कारांची घोषणा केली आहे. प्रख्यात संगीतकार, गायक आणि संगीत दिग्दर्श हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला असून अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओकला चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ लेखक सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच अभिनेत्री राणी मुखर्जीची राज कपूर विशेष योगदान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

राज्याचे सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Maharashtra TimesChinmayee Sumeet : ‘पक्षाप्रमाणेच निरर्थक गोष्टी करतायत, बेरोजगारी वाढवायची, मुलांचा आत्मसन्मान दुखवायचा’, कंगना रणौतवर चिन्मयी सुमीतचा संताप
हृदयनाथ मंगेशकर यांच्या कामाबद्दल सांगायचं तर त्यांनी ‘त्या फुलांच्या गंधकोषी’, ‘सागरा प्राण तळमळला’ यांसारखी अजरामर गाणी गायली आहेत. यापूर्वी हृदयनाथ मंगेशकर यांना २००९ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे.
Maharashtra TimesKangana Ranaut : ‘कित्येक लोकांसाठी मोदी देव आहेत, त्यांच्या भावना दुखावू नका’; कंगनाचं आणखी एक विधान चर्चेत
दरम्यान, मराठी अभिनेता प्रसाद ओकनं आजवर अनेक गाजलेल्या सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. धर्मवीर आणि धर्मवीर २ या सिनेमांचं दिग्दर्शनही प्रसादनं केलं आहे. सलीम खान हे बॉलिवूडचे ज्येष्ठ पटकथा लेखन असून जावेद अख्तर यांच्यासोबत मिळून त्यांनी गाजलेल्या सिनेमांच्या पटकथा लिहिल्या आहेत. राखी मुखर्जीच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं ‘हम तुम’, ‘मर्दानी’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’ यांसारख्या सिनेमांमध्ये तिनं काम केलं आहे.