Landslide in Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. अशातच लांजा वाकेड येथे पेट्रोल पंपाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सर्वात रात्री दहाच्या सुमारास केबिनवर मोठी दरड कोसळली आहे. या घटनेत केबिन मध्ये बसलेला एक इसम या दरडीखाली अडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : लांजा तालुक्यातील वाकेड घाट परिसरात सुरू असलेल्या नवीन पेट्रोल पंपाच्या बांधकामस्थळी शनिवारी पावसामुळे अचानक दरड कोसळल्याची शनिवारी 8.30 वाजण्याच्या सुमारास घटना घडली. या दुर्घटनेत एका वृद्ध व्यक्तीला दरडीखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, त्याच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाकेड बौद्धवाडीजवळ राष्ट्रीय महामार्गालगत मुंबई येथील श्रीकांत बोबडे यांच्या नवीन पेट्रोल पंपाचे बांधकाम सुरू आहे. कामाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या केबिनच्या शेजारी एक वृद्ध व्यक्ती पावसापासून बचाव करण्यासाठी थांबली होती. त्याचवेळी अचानक डोंगराचा काही भाग खचून मोठी दरड कोसळली आणि संबंधित व्यक्ती तिच्याखाली अडकल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच तहसीलदार प्रियांका ढोले, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच जेसीबी यंत्र, लांजा आपत्कालीन व्यवस्थापन पथक आणि अन्य यंत्रणांना पाचारण करण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे.
15 ऑगस्टपर्यंत बंदी, तरी मासेमारी कोण करतंय? कोकणातील मच्छीमारांचा संतप्त सवाल!
दरम्यान, घटनास्थळी काम करणारे तीन कामगार – जेद अतिकुल त्यागी (वय १८), सुवेल अयुब त्यागी (वय १९) आणि महंमद समीन साहवेज (वय २२) हे सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आली असून, दरडीखाली अडकलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आणि त्याची सुटका करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील आहे. पुढील तपशील बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. Ratnagiri Rain : रत्नागिरीत पावसाचे रौद्ररुप, मोठे भूस्खलन; कासई शिंदेवाडीजवळ दरड कोसळली, जगबुडीने इशारा पातळी ओलांडली तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाने कहर केला असून वैभववाडी तालुक्यात भुईबावडा घाटात रात्री उशिरा साडेनऊ ते दहा च्या सुमारास दरड कोसळली आहे.दरड कोसळल्यानंतर रात्री उशिरा दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.ही दरड बाजूला करण्या काम युद्धपातळीवर सुरू असून एकेरी वाहतूक संथगतीने सुरू करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी घटनेचा आढावा घेतला असून प्रशासनाजवळ चर्चा केली आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा