Headlines

मृतदेहांचे तुकडे करत तयार करायचा डिश


दफनभूमीतून मृतदेह चोरून आणायचा

हंगेरी या देशात एक असे प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनाच धक्का बसला आहे. एका 30 वर्षीय इसमावर दफभूमी आणि रुग्णालयांमधून मानवी अवशेष चोरण्याचा आरोप आहे. चौकशीदरम्यान पोलीस त्याच्या घरी पोहोचले असता तेथे मिळालेल्या सामग्रीमुळे हे पूर्ण प्रकरण आणखी रहस्यमय झाले आहे.

एक इसम स्वत:च्या घरी आणि कार्यस्थळी मानवी शरीराचे अवयव आणि अवशेष लपवत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. यानंतर हंगेरीच्या राष्ट्रीय तपास ब्युरोटच्या टीमने 17 जून रोजी राजधानी बुडापेस्ट येथील त्याच्या घरी छापा टाकला.

चकित करणारे अवशेष.

झडतीदरम्यान पोलिसांनी अनेक मानवी अवशेष हस्तगत केले आहेत. तेथे कवट्या, एक पूर्ण पाय, एक हात आणि त्वचेच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या मानवी चेहऱ्याचे मॉडेल मिळाले आहे. याचबरोबर अनेक हाडांनी भरलेली सूटकेस हस्तगत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तपास अधिकाऱ्यांनी एक जारही मिळाला असून ज्यात एक हृदयासारखे अववय ठेवण्यात आले होते, सध्या तो मानवी आहे का प्राण्याचा हे जाणून घेण्याचा प्रयत्न सध्या तज्ञ करत आहेत.

चकित करणारा दावा

मानवी शरीराचे अवयव आणि अवशेष एकत्र करत होतो अशी कबुली आरोपीने दिली आहे. तर शरीररचना शास्त्र (एनाटॉमी) आणि पॅथालॉजीमध्ये विशेष रुची असल्याचा दावा त्याने केला आहे. हे कृत्य केवळ अवशेष एकत्र करण्यापुरती मर्यादित नव्हते. काही अवशेषांचा वापर त्याने भोजन तयार करण्यासाठी केला होता असेही त्याने सांगितले आहे. परंतु पोलीस या दाव्याची स्वतंत्रपणे चौकशी करत आहेत.

दफनभूमीतून चोरी

आरोपीला काही अवशेष त्याच्या रुग्णालयांमध्ये काम करण्यादरम्यान मिळालेले असू शकतात. याचबरोबर स्लोवाकिया आणि हंगेरीच्या दफनभूमींमधून त्याने अवशेष बाहेर काढल्याचा संशय आहे. आरोपीला मानवी शरीराच्या अवैध वापराच्या संशयातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचा कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब्लेट, मोबाइल, सिमकार्ड आणि अन्य डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.

फॉरेन्सिक तपासणी

सध्या हस्तगत सर्व अवशेषांना फॉरेन्सिक तज्ञांकडे पाठविण्यात आले आहे. हे अवशेष  कुठून आले आणि किती लोकांशी संबंधित असू शकतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न तपास अधिकारी करत आहेत. फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यावर आरोपीच्या विरोधात आणखी गंभीर गुन्हे नोंदविले जाऊ शकतात. सध्या हे प्रकरण हंगेरीत चर्चेचा विषय ठरले असून तपास यंत्रणा याच्या सर्व पैलूंची पडताळणी करत आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत